शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या नागरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 01:48 IST

येथील प्रभाग क्र मांक दहा ड च्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा राखण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेत्यांसह सातपूरला बैठक घेऊन दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे यांच्या उमेदवारीवर सोमवारी (दि. ३) शिक्कामोर्तब केले आहे. सदरची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी भाजपाने राष्टवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांना साकडे घातले. तथापि, पक्षच याबाबत निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

सातपूर : येथील प्रभाग क्र मांक दहा ड च्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा राखण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेत्यांसह सातपूरला बैठक घेऊन दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे यांच्या उमेदवारीवर सोमवारी (दि. ३) शिक्कामोर्तब केले आहे. सदरची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी भाजपाने राष्टÑवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांना साकडे घातले. तथापि, पक्षच याबाबत निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.प्रभाग क्र मांक दहामधील भाजपा नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक प्रक्रि या सुरू झाली आहे. ३० मेपासून ते ६ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सोमवारी सायंकाळी भाजपा मंडल अध्यक्ष शशिकांत जाधव यांच्या निवासस्थानी संघटक किशोर काळकर, महापौररंजना भानसी, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, विजय साने, प्रशांत जाधव, सभागृह नेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी मोरुस्कर, नगरसेवक डॉ. वर्षा भालेराव, माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, रवींद्र धिवरे, रोहिणी नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रभागाचा आढावा घेण्यात आला आणि भाजपाची उमेदवारी दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे. या बैठकीस विक्र म नागरे, रामहरी संभेराव, राजेश दराडे, संजय राऊत, दिनकर कांडेकर, गणेश बोलकर, मंगल खोटरे, स्मिता जोशी, पवन भगूरकर, निवृत्ती इंगोले, राजेंद्र चिखले आदींसह मंडल पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाने पोटनिवडणुकीची जबाबदारी मंडल अध्यक्ष शशिकांत जाधव यांच्यावर सोपविली आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्यासह तिन्ही आमदार व अन्य पदाधिकाऱ्यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्याशी चर्चा केली.तेव्हा भाजपाने ऐकले नव्हते त्याचे काय?भाजपाने प्रस्ताव सादर केल्यानंतर मनसेच्या (कै.) सुरेखा भोसले यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीच्या वेळी त्यांच्या कुटुंबातच उमेदवारी दिली जाणार असताना भाजपाने सहकार्य केले नव्हते त्याचे स्मरण करून दिले. त्यावेळी विरोधी पक्षांनी बिनविरोध निवडणुकीसाठी अ‍ॅड. वैशाली भोसले यांच्या विरोधात उमेदवारी देऊ नका, अशी विनंती करूनही भाजपा आणि शिवसेनेने उमेदवार दिले होते. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करणाºया भाजपाला त्याचेदेखील विरोधकांनी स्मरण करून दिले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूकBJPभाजपा