लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : जेलरोड सेंट फिलोमिना शाळेसमोर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात सुदैवाने कोणी गंभीर जखमी झाले नसले तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे.जेलरोडच्या दिशेने जाणाºया गाडीने सेंट फिलोमिना शाळेसमोर स्कॉर्पिओ गाडीला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे स्कॉर्पिओ गाडी जेलरोडकडून येणाºया दुसºया स्कॉर्पिओवर जाऊन धडकली. याचवेळी जेलरोडकडून बिटकोच्या दिशेने येत असलेल्या आयशर गाडीने स्कॉर्पिओ गाडीला पाठीमागून धडक दिल्याने तिचे मोठे नुकसान झाले आहे. जनरेटर गाडीचालकामुळे झालेल्या अपघातानंतर नागरिकांनी चालकास बेदम चोप दिला.
फिलोमिना शाळेसमोर विचित्र अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:27 IST