शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

गोरगरीबांना मायेची ऊब; ५००ब्लॅँकेट, ८० गोधड्या वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:39 IST

शहरात वाढलेली थंडी आणि आगामी ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर मानव उत्थान मंचाकडून ‘बिइंग सांता’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

ठळक मुद्देकुलूपबंद निवाराशेड उघडण्यासाठी आंदोलन १ लाख दहा हजारांचा निधी उभारण्यास यश

नाशिक : आठवडाभरापासून शहरात थंडीचा कडाका वाढला असून तापमान हे आठ अंशापर्यंत खाली घसरले आहे. यामुळे गोदाकाठावर राहणाऱ्या गोरगरीबांना अधिक त्रास सोसावा लागत आहे. उघड्यावर जीवन जगणाºयांना उबदार कपड्यांचे संरक्षण देत सामजिक संवदेना जागृत ठेवण्याचा संदेश मानव उत्थान मंचच्या युवा स्वयंसेवकांनी दिला.शहरात वाढलेली थंडी आणि आगामी ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर मानव उत्थान मंचाकडून ‘बिइंग सांता’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत त्र्यंबकेश्वर बसस्थानकासह शहरातील सातपूर, पंचवटी अमरधाम, गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्वर मैदान, रोकडोबा मैदान, गौरी पटांगण, रामकुंड आदि भागात उघड्यावर जीवन जगणाºया गोरगरीबांना सुमारे ५०० ब्लॅँकेट, ८० गोधड्यांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमासाठी मंचाकडून सोशल मिडियाच्या माध्यमातून समाजातील दानशुरांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी काही नागरिकांनी रोख रक्कम तर काहींनी जुने कपडयांच्या स्वरुपात या स्वयंसेवी संस्थेच्या ‘बिइंग सांता’ या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला. यामुळे १ लाख दहा हजारांचा निधी उभारण्यास यश आले. संकलित करण्यात आलेल्या जुन्या कपड्यांपासून गोधड्या तयार करण्यात आल्या. गरजू निराधारांना कुपनद्वारे या गोधड्या व ब्लॅँकेटचे वाटप करण्यात आले. सातत्याने विविध सामाजिक संकल्पनांद्वारे या संस्थेचा युवा स्वयंसेवी वर्ग उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करत असतो. काही दिवसांपुर्वीच दिपावलीच्या पार्श्वभूमीवर हातावरील कामगारांना दिवाळी ‘फराळ टिफीन’ भेट म्हणून वाटण्यात आले होते. मागील आठ ते दहा वर्षांपासून अशाच पध्दतीचा उपक्रम राबविला जात आहे. दिवसेंदिवस हा उपक्रम व्यापक करण्याचा प्रयत्न असल्याचे उपक्रम समन्वयक जसमीत सहेमी यांनी सांगितली.कुलूपबंद निवाराशेड उघडण्यासाठी आंदोलनशहरातील गोदाकाठालगत बेघर गोरगरीबांना हिवाळ्यातील कडाक्याची थंडी, मुसळधार पाऊस आणि उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षणासाठी महापालिकेने उभारलेले निवारागृहे कुलूपबंद अवस्थेत आहे. ही निवारागृहे तातडीने उघडून स्वच्छता करुन संबंधितांना उपलब्ध करुन देण्यासाठी आंदोलन उभारणार असल्याचे जगबिर सिंह यांनी सांगितले. मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांना याबाबत निवेदन देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिकsocial workerसमाजसेवक