शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पिसाळलेल्या  श्वानाचा पाच मुलांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 00:45 IST

जुने नाशिक परिसरातील सुमारे पाच मुलांसह महिला, पुरुषांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्याची घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेतील जखमी मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

नाशिक : जुने नाशिक परिसरातील सुमारे पाच मुलांसह महिला, पुरुषांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्याची घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेतील जखमी मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. जुन्या नाशकात काही दिवसांपासून मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मनपा प्रशासनाने मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.जुने नाशिक परिसर गावठाण म्हणून ओळखला जातो. या भागात अरुंद गल्लीबोळ व दाट लोकवस्ती आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात मोकाट श्वानांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी एका पिसाळलेल्या मोकाट श्वानाने एक दोन नव्हे तर तब्बल आठ ते दहा जणांवर हल्ला चढवून चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे जुन्या नाशकात श्वानांची दहशत पसरली असून, नागरिक भयभीत झाले आहेत. श्वान लहान मुलांच्या अंगावर चवताळून जात आहे. चौकमंडई, बागवानपुरा, कथडा, बडी दर्गा, पिंजारघाट, गंजमाळ या भागातील पाच मुलांसह एकूण नऊ व्यक्तींना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतल्याची घटना घडली आहे.जखमींमध्ये वसीम सत्तार (३०), अशरफ खान (५४), फैयाज खान (४४), हमीद अन्सारी, अलाउद्दीन सय्यद, जोया कोकणी, सोहम शिवाळे, आयशा सय्यद, रमेश पाटोळे यांचा समावेश आहे. पिसाळलेल्या श्वानाने जुने नाशिक परिसरात नऊ जणांना चावा घेतल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.घटना गंभीर; सुदैवाने अनर्थ टळलाजुने नाशिक परिसरातील महिला, पुरुषांसह लहान मुलांना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेण्याची घटना गंभीर स्वरूपाची असून सुदैवाने अनर्थ टळला, अन्यथा गंभीर जखमी होऊन जीवितहानीचाही धोका ओढावला असता. श्वानाने किरकोळ स्वरूपात जखमी केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. महापालिका प्रशासनाने या भागात सातत्याने मोकाट श्वानांच्या बंदोबस्ताची मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :dogकुत्राNashikनाशिकhospitalहॉस्पिटल