शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

बिटको रुग्णालयाचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:44 IST

नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी मोठी रुग्णालये उभारली असून, वैद्यकीय अधिकारीही नियुक्त केले आहेत़ आरोग्य यंत्रणेवर महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत असली तरी महापालिकेच्या या रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकारी आपल्यावरील जबाबदारी झटकून रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाचा रस्ता दाखवित असल्याचे समोर आले आहे़

नाशिक : नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी मोठी रुग्णालये उभारली असून, वैद्यकीय अधिकारीही नियुक्त केले आहेत़ आरोग्य यंत्रणेवर महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत असली तरी महापालिकेच्या या रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकारी आपल्यावरील जबाबदारी झटकून रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाचा रस्ता दाखवित असल्याचे समोर आले आहे़ यामध्ये नाशिकरोडचे बिटको रुग्णालय आघाडीवर असून, मे महिन्यापासून रुग्णालयात फिजिशियनच नसल्याची माहिती तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.नाशिक महापालिका क्षेत्रातील नाशिकरोड, जेलरोड, दसक, पंचक, एकलहरा, शिंदे, पळसे, लहवित, वडनेर, संसरी या ठिकाणच्या नागरिकांच्या आरोग्यसुविधेसाठी नाशिक महापालिकेचे जे़डी़सी़ बिटको रुग्णालय आहे़ या रुग्णालयात केवळ महापालिका क्षेत्रातीलच नव्हे सिन्नर तालुक्यातूनही रुग्ण उपचारासाठी दाखल होतात़ या ठिकाणी रुग्णांवर उपचार होणे आवश्यक असताना त्यांना सर्रास जिल्हा रुग्णालयात ट्रान्स्फर केले जात आहे़ विशेष म्हणजे ट्रान्स्फर करताना फिजिशियन नसल्याचे कारण दिले जाते़ बिटको रुग्णालयातील फिजिशियन डॉ़ गरुड हे एप्रिल महिन्यात सेवानिवृत्त झाले असून, त्यानंतर रुग्णांची दैना सुरू झाली़नागरिकांच्या आरोग्यासाठी शहरातील विविध ठिकाणी महापालिकेची सहा मोठी रुग्णालये व १२ प्रसूतिगृहे आहेत़ मात्र, बहुतांशी ठिकाणी डॉक्टर नाहीत, रुग्णाची प्रकृती गंभीर आहे अशी कारणे देऊन रुग्णसेवा देण्यास टाळाटाळ केली जाते़ पंचवटीतील मायको रुग्णालयात पोहोचलेल्या गर्भवती महिलेची रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांअभावी रिक्षातच प्रसूती झाल्याची घटना गतवर्षी घडली होती़ महापालिका दरवर्षी आरोग्य सुविधेवर कोट्यवधी रुपये खर्च करते मात्र रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यास टाळाटाळ केली जाते़ रुग्णांना सर्रास जिल्हा रुग्णालयाचा रस्ता दाखविला जात असल्याने जिल्हा रुग्णालयावर अतिरिक्त ताण पडत असून, त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे़ शहरवासीयांनी चांगली आरोग्यसेवा मिळेल यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनीच प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे़दोन हजाराहून अधिक रुग्णनाशिक महानगरपालिकेच्या जेडीसी बिटको हॉस्पिटलमधून जिल्हा रुग्णालयात ट्रान्स्फर करण्यात आलेल्या रुग्णास देण्यात आलेल्या पावतीवर बुक नंबर ४३ व पास नंबर ४६ असा उल्लेख आहे़ साधारणत: एक बुक ५० पानांचे गृहीत धरल्यास आतापर्यंत दोन हजार १९६ रुग्ण जिल्हा रुग्णालयात ट्रान्सफर केल्याचे समोर दिसून येते़ विशेष म्हणजे रुग्णांच्या पासवर फिजिशियन नसल्याचा सर्रास उल्लेख केला जातो़एप्रिलपासून फिजिशियन नाहीजिल्हा रुग्णालयात सर्रास रुग्ण पाठविण्याबाबत महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांशी संवाद साधला असता, त्यांनी फिजिशियन डॉ़ गरुड एप्रिलमध्ये सेवानिवृत्त झाले़ तेव्हापासून बिटको रुग्णालयात फिजिशियन नसल्याचे सांगून रुग्णालयातील एमबीबीएस डॉक्टर हे रुग्णावर उपचार करायचा वा जिल्हा रुग्णालयात पाठवायचे याबाबत निर्णय घेतात़ अडचण असल्यास पेशंटला मला भेटण्यास, सांगा असेही उत्तर या वैद्यकीय अधिकाºयाने दिले़

टॅग्स :hospitalहॉस्पिटल