सटाण्यात साखर वाटून साजरा केला खड्ड्यांचा वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 10:52 PM2019-12-06T22:52:25+5:302019-12-07T00:34:29+5:30

सटाणा शहरामधून जाणाºया साक्र ी-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर गेल्या एक ते दीड वर्षापासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, संबंधित विभागाला अनेकवेळा निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यात वृक्षारोपण व साखर वाटून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून गांधीगिरी केली.

Birthday of pits celebrated by distributing sugar in chutney | सटाण्यात साखर वाटून साजरा केला खड्ड्यांचा वाढदिवस

रस्ता दुरु स्तीची मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी खड्ड्यात वृक्षारोपण करत साखर वाटून गांधीगिरी केली. या आंदोलनात सहभागी रु पाली धोंडगे, रवि सोनवणे, नंदू सोनवणे आदी.

Next
ठळक मुद्देगांधीगिरी : अनेकवेळा निवेदन देऊनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष





सटाणा : शहरामधून जाणाºया साक्र ी-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर गेल्या एक ते दीड वर्षापासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, संबंधित विभागाला अनेकवेळा निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यात वृक्षारोपण व साखर वाटून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून गांधीगिरी केली.
शहरापासून देवळ्याकडे जाणाºया महामार्गावर मोठ्या प्रमाणात खोलवर खड्डे पडल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. रस्त्याला लागून महाविद्यालय, विविध उद्योगधंदे, व्यापारी प्रतिष्ठान असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून मार्गक्र मण करावे लागते. बºयाच वेळा खड्डे टाळण्याच्या नादात अपघात होऊन अनेक निष्पाप व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले ैआहे, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. याबाबत संबंधित विभागाला कोणतेही सोयरसुतक नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तत्काळ कायमस्वरूपी डांबरीकरणाद्वारे खड्डे बुजविण्यात यावे व जनतेला होणाºया त्रासापासून मुक्त करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आंदोलनात राजेंद्र सोनवणे यांच्यासह सुभाष पाटील, राजेश जाधव, नितीन आहेर, कैलास आहिरे, मधुकर जाधव, रवि शिंदे, दादाजी खैरनार आदी सहभागी झाले होते.
संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाठपुरावा केला असता त्यांनी याची जबाबदारी राज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची असल्याचे सांगून हात वर केल्याच आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित विभागाचे वेळकाढूपणाचे धोरण असल्याने जॉगिंगला जाणारे पादचारी व विद्यार्थ्यांनी संबंधित विभागाला जाग यावी म्हणून गांधीगिरी मार्गाने शुक्र वारी (दि.६) ताहाराबाद रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून साखर वाटून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला.

Web Title: Birthday of pits celebrated by distributing sugar in chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.