शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नराधम पित्यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:25 IST

जन्मदात्या पित्याने पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत कुकर्म करत वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला कुमारी माता बनविण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मूळ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण येथील या नराधम शेतमजूर पित्याला जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधा एस. नायर यांनी बलात्कार व पोस्कोच्या गुन्ह्णात दोषी धरले. त्याला न्यायालयाने बुधवारी (दि.२२) जन्मठेप व ३१ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देपांढुर्ली : २०१५ साली पोटच्या मुलीवर केले होते अत्याचार

नाशिक : जन्मदात्या पित्याने पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत कुकर्म करत वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला कुमारी माता बनविण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मूळ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण येथील या नराधम शेतमजूर पित्याला जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधा एस. नायर यांनी बलात्कार व पोस्कोच्या गुन्ह्णात दोषी धरले. त्याला न्यायालयाने बुधवारी (दि.२२) जन्मठेप व ३१ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावाच्या शिवारात आपल्या कुटुंबासह तोरंगण येथून स्थलांतर करून हा नराधम बाप वास्तव्यास होता. त्याने आॅक्टोबर २०१५ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत पत्नी शेतावर मजुरीसाठी गेल्यानंतर सोळावर्षीय मुलीला धाक दाखवून आई व भावंडांना जिवे ठार मारण्याची धमकी देत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. बापाच्या धमकीमुळे पीडित मुलीने याबाबत कुठेही तक्रार केली नाही. त्यानंतर आरोपीने याचा गैरफायदा घेत वारंवार अत्याचार केले. त्यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. जिल्हा शासकीय रुग्णालयात तिचे बाळंतपण करण्यात आले. पीडिता कुमारी माता असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून सिन्नर पोलिसांना कळविण्यात आली.पोलिसांनी तत्काळ रुग्णालय गाठले आणि पीडितेचा जबाब घेत तपासाला गती दिली. त्यानुसार आरोपीविरोधात बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण (पोस्को) व भारतीय दंड विधान कलम ३७६नुसार बलात्काराचा गुन्हा सिन्नर पोलिसांनी दाखल केला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक तृप्ती आठवले यांनी तपास करून पीडित मुलीच्या नराधम पित्यास बेड्या ठोकल्या. तसेच परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. रेवती कोतवाल यांनी युक्तिवाद केला.डीएनए जुळल्याचे न्यायालयात सिद्धजन्मास आलेले मूल व आरोपी पीडित मुलीचा नराधम बाप याचे डीएनए जुळल्याने आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. त्यामुळे न्यायालयाने आरोपी पित्याला जन्मठेप व ३१ हजार रु पयांचा दंड ठोठावला. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक नासीर सय्यद, पोलीस शिपाई ज्योती उगले यांनी पाठपुरावा केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी