शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

कुकर्म करणाऱ्या नराधम पित्यास न्यायालयाकडून जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 18:22 IST

सोळावर्षीय मुलीला धाक दाखवून आई व भावंडांना जीवे ठार मारण्याची धमकी देत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. बापाच्या धमकीमुळे पिडित मुलीने याबाबत कुठेही तक्रार केली नाही.

ठळक मुद्देबलात्कार व पोस्कोच्या गुन्ह्यात दोषी धरलेडीएनए जुळल्याने आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचे सिद्ध

नाशिक : जन्मदात्या पित्याने पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत कुकर्म करत वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला कुमारी माता बनविण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुळ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण येथील एका नराधम शेतमजूराला जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधा एस. नायर यांनी बलात्कार व पोस्कोच्या गुन्ह्यात दोषी धरले. त्याला न्यायालयाने बुधवारी (दि.२२) जन्मठेप व ३१ हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावाच्या शिवारात आपल्या कुटुंबासह तोरंगण येथून स्थलांतर करून हा नराधम बाब वास्तव्यास होता. त्याने आॅक्टोबर २०१५ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीत पत्नी शेतावर मजुरीसाठी गेल्यानंतर सोळावर्षीय मुलीला धाक दाखवून आई व भावंडांना जीवे ठार मारण्याची धमकी देत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. बापाच्या धमकीमुळे पिडित मुलीने याबाबत कुठेही तक्रार केली नाही. त्यानंतर आरोपीने याचा गैरफायदा घेत वारंवार अत्याचार केले. त्यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. जिल्हा शासकीय रु ग्णालयात तिचे बाळंतपण करण्यात आले. पीडिता कुमारी माता असल्याची माहिती रु ग्णालय ्रप्रशासनाकडून सिन्नर पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी तत्काळ रूग्णालय गाठले आणि पिडितेचा जबाब घेत तपासाला गती दिली. त्यानुसार आरोपीविरोधात बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण (पोस्को) व भारतीय दंड विधान कलम ३७६नुसार बलात्काराचा गुन्हा सिन्नर पोलिसांनी दाखल केला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक तृप्ती आठवले यांनी तपास करु न पिडित ुमुलीच्या नराधम पित्यास बेड्या ठोकल्या. तसेच परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. रेवती कोतवाल यांनी युक्तीवाद केला. जन्मास आलेले मुल व आरोपी पिडित मुलीचा नराधम बाप याचे डीएनए जुळल्याने आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. त्यामुळे न्यायालयाने आरोपी पित्याला जन्मठेप व ३१ हजार रु पयांचा दंड ठोठावला. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक नासीर सैय्यद, पोलीस शिपाई ज्योती उगले यांनी पाठपुरावा केला.

टॅग्स :Courtन्यायालयRapeबलात्कारNashikनाशिकPOCSO Actपॉक्सो कायदा