शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीस जाळून मारणाºया पतीस जन्मठेपमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:17 IST

घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नीच्या अंगावर डिझेल टाकून जाळणाºया पतीस प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि़२३) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ राष्ट्रपाल आनंदा धाबो (२७, रा़ कवठेकरवाडी, पांडवलेणी, पाथर्डी फाटा, नाशिक) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे़ सरकारी वकील शिरीष कडवे यांनी या खटल्यात नऊ साक्षीदार तपासून आरोप सिद्ध केले़

नाशिक : घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नीच्या अंगावर डिझेल टाकून जाळणाºया पतीस प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि़२३) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ राष्ट्रपाल आनंदा धाबो (२७, रा़ कवठेकरवाडी, पांडवलेणी, पाथर्डी फाटा, नाशिक) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे़ सरकारी वकील शिरीष कडवे यांनी या खटल्यात नऊ साक्षीदार तपासून आरोप सिद्ध केले़  पाथर्डी फाट्यावरील कवठेकरवाडीमध्ये आरोपी राष्ट्रपाल आनंदा धाबो हा पत्नी रमासह राहात होता़ ७ जानेवारी २०१६ रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास झालेल्या भांडणानंतर राष्ट्रपालने पत्नीला मारहाण केली़ यामुळे पत्नी रमा हिने घरातील कॅनमधील डिझेल अंगावर ओतून घेत जाळून घेण्याची धमकी दिली़ यानंतर पती राष्ट्रपाल याने अधिक शिवीगाळ करून पत्नीच्या अंगावर जमिनीवर डिझेल पडले असल्याचे माहिती असूनही काडी पेटवून पत्नीच्या अंगावर टाकली़ यामुळे रमाच्या अंगावरील साडीने पेट घेतला व ती ओरडू लागल्याने राष्ट्रपालने पलायनाचा प्रयत्न केला़ मात्र, नागरिक जमा झाल्याने त्याने पत्नीची साडी विझविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती ९० टक्के जळाल्याने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात राष्ट्रपाल धाबो विरोधात जिवे ठार मारण्याचा व त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील शिरीष कडवे यांनी नऊ साक्षीदार तपासून आरोप सिद्ध केले़ दोन मृत्युपूर्व जबाबरमा धाबो या विवाहितेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना स्ट्रोव्हच्या भडक्यात भाजल्याचे सांगितले, तर आपल्या भावास पतीने जाळल्याचे सांगितले. मात्र दुसºया जबाबात पतीने काडी लावून पेटविल्याचा जबाब दिला. त्यामुळे या खटल्यात मयत रमा धाबोचे दोन मृत्युपूर्व जबाब होते. न्यायाधीश शिंदे यांनी परिस्थितीजन्य पुरावे हे दुसºया जबाबाशी तर्कसंगत असल्याने तो ग्राह्य धरत शिक्षा सुनावली.

टॅग्स :crimeगुन्हे