शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

चंदनपुरी शिवारात बायोडिझेल पंप सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 01:43 IST

मालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी शिवारातील मनमाड रोडवर गट क्र. ३९१/ब मध्ये विनापरवानगी सुमारे चार लाख २२ हजार ११० रुपये किमतीचे ६ हजार ४९४ लिटर डिझेलचा साठा व पंप महसूल विभागाने सील केला आहे.

ठळक मुद्देमालेगाव : विनापरवानगी डिझेलचा साठा जप्त; महसूलची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : तालुक्यातील चंदनपुरी शिवारातील मनमाड रोडवर गट क्र. ३९१/ब मध्ये विनापरवानगी सुमारे चार लाख २२ हजार ११० रुपये किमतीचे ६ हजार ४९४ लिटर डिझेलचा साठा व पंप महसूल विभागाने सील केला आहे.चंदनपुरी शिवारातील मनमाड रोडवरील गट क्र. ३९१/ब येथे अनधिकृत बायोडिझेल विक्रीचा पंप सुरू असल्याची माहिती तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार राजपूत यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश नायब तहसीलदार डी.बी. वाणी, विकास पवार, पुरवठा निरीक्षक अशोक सावणे, कौळाणे मंडळ अधिकारी एस. डी. काळे, तलाठी आर. झेड. धाडी, मधुकर बच्छाव यांना दिले होते. त्यानुसार संबंधितांनी चौकशी केली असता पंपावर संदीप नंदू खैरनार व सुमित अरुण पगारे हे कर्मचारी असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे पंपाच्या व बायोडिझेल विक्री बाबतच्या परवानगीबाबत विचारले असता केवळ चंदनपुरी ग्रामपंचायत व वैधमापन विभागाची परवानगी आढळून आली. इतर विविध प्रकारच्या ११ परवानगी आवश्यक असताना त्या आढळून आल्या नाहीत. विनापरवानगी बायोडिझेलची विक्री केली जात असल्याचे दिसून आले. तत्कालीन ६ हजार ४९४ लिटर डिझेल, बायोडिझेल वाटपाचे डिस्प्ले, साठा करण्याची टाकी, पत्र्याच्या शेडची कॅबिन सील करण्यात आली आहे. याप्रकरणी तहसीलदार राजपूत यांनी पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. या धडक कारवाईमुळे तालुक्यात विनापरवानगी बायोडिझेल विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी