शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बिहाड मोर्चा देवळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:16 IST

गेल्या पंधरा वर्षांपासून आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये अनेक पदांसाठी भरती करण्यात आलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी नंदुरबार येथून निघालेल्या बिºहाड मोर्चाचे मंगळवारी देवळा येथे आगमन झाले.

देवळा/लोहोणेर : गेल्या पंधरा वर्षांपासून आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये अनेक पदांसाठी भरती करण्यात आलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी नंदुरबार येथून निघालेल्या बिºहाड मोर्चाचे मंगळवारी देवळा येथे आगमन झाले.  या मोर्चात दोन हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. यात गर्भवती महिला व बालकांचाही समावेश आहे. महिला कर्मचाºयांची संख्यादेखील मोठी आहे. मोर्चेकरी आदिवासी विकास आयुक्तालय येथे सामूहिक आत्मदहन करण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली आहे. मोर्चामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोलमडली होती. सदर कर्मचाºयांना सेवेत घेण्याचे आश्वासन सरकारने दिले होते; मात्र त्यांना अजूनही सेवेत समाविष्ट केलेले नाही. तसेच मागील आठ महिन्यांपासून मानधनही दिले गेले नसल्याने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी या कर्मचाºयांनी नंदुरबार ते नाशिक बिºहाड मोर्चा काढला आहे.  दुपारपासूनच पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. उन्हाच्या तीव्र झळा सहन करत प्रलंबित मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी नंदुरबार येथील शासकीय आश्रमशाळांमधील रोजंदारी कर्मचाºयांचा गेल्या सहा दिवसांपासून बिºहाड मोर्चा निघाला आहे. नंदुरबार ते नाशिक पायी चालत जात ते सरकारला जाब विचारणार आहेत. सरकारने अनेकवेळा लेखी आश्वासन दिले. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यावरही आदिवासी विकास विभाग आपल्यावर अन्याय करीत असल्याचा भावना या आंदोलकांनी व्यक्त केल्या आहेत. या कर्मचाºयांबाबत ठोस भूमिका सरकार घेत नसल्याने आंदोलकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सटाण्याहून लोहोणेरमार्गे मोर्चा देवळ्यात आला.अशा आहेत मागण्याआदिवासी विकास विभागातील या रोजंदारी कर्मचाºयांना गेल्या आठ महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. अनेकवेळा आंदोलन केले, आश्वासन मिळाले मात्र पदरी काही पडले नाही. यातील अनेक कर्मचाºयांची वयोमर्यादाही संपली आहे. त्यांना आता दुसरीकडे कुठे नोकरी ही करता येणार नाही. एका तपापेक्षा अधिक काळ हा संघर्ष सुरू आहे. लोकप्रतिनिधी बोलण्यास तयार नाहीत, अशी खंत आहे. या कर्मचाºयांना न्याय देण्यापेक्षा सरकार नवीन भरती करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक