शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

मोठ्या टीचरने आम्हाला खोटे बोलायला सांगितले!

By admin | Updated: February 25, 2015 23:59 IST

विद्यार्थिनींचा जबाब : विडी कामगार मनपा शाळेतील प्रकरणाला वळण

नाशिक : ‘मोठ्या टीचरने आम्हाला खोटे बोलायला सांगितले. वर्गखोलीचा दरवाजा बंद करून आमच्याकडून भोर सरांविषयी काहीबाही बोलून घेतले आणि त्याचे रेकॉर्डिंग करत बदनामीची धमकी दिली’, असा जबाब पंचवटीतील विडी कामगारनगरमधील मनपा शाळा क्रमांक ४५ मधील दहा-बारा विद्यार्थ्यांनी बुधवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्यासमोर नोंदवल्याने शिक्षक विनयभंग प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, विद्यार्थिनींच्या पालकांनी जोपर्यंत मुख्याध्यापक लता गरड यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत मुलींना शाळेत न पाठविण्याचा पवित्रा घेतला आहे. विडी कामगारनगरमधील मनपा शाळा क्रमांक ४५ मधील शिक्षक मुरलीधर गोपीनाथ भोर यांच्याविरुद्ध विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन करणे, त्यांना अश्लील छायाचित्रे दाखविणे या कृत्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक लता गरड यांनी आडगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित शिक्षक भोर यांच्याविरुद्ध लहान मुलांचे लैंगिक अपराध संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करत अटक केली होती. त्याचबरोबर शाळेत दंगल घडवून आणल्याबद्दल काही पालकांविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले असून, ज्या विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप झाला होता, त्याच विद्यार्थिनींनी आपल्या पालकांसमवेत बुधवारी महापालिकेचे राजीव गांधी भवन गाठले आणि आयुक्तांच्या अनुपस्थितीत नुकतेच रुजू झालेले अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. विद्यार्थिनींनी सांगितले, ‘मोठ्या टीचरने आम्हाला खोटे बोलायला सांगितले. आम्ही जर तसे बोललो नाही, तर व्हॉट्स अ‍ॅपवरून तुमची बदनामी केली जाईल’, अशी धमकी दिली. त्यावर अतिरिक्त आयुक्त चव्हाण यांनी मोठ्या टीचर कोण, असा प्रश्न केला असता विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक लता गरड यांचे नाव घेतले आणि गरड यांच्याविरुद्ध पाढाच वाचायला सुरुवात केली. याचवेळी पालकांनीही गरड मॅडम या प्रशासनाधिकारी कुंवर मॅडम आपल्या मैत्रीण असल्याने माझे काहीही होणार नाही, असे सांगत असल्याचेही कथन केले. पालक शिक्षक समितीचे सदस्य अमोल जगळे यांनीही शाळेच्या कारभाराबद्दल माहिती दिली. दरम्यान, पालकांनी जोपर्यंत गरड यांना सक्तीच्या रजेवर अथवा त्यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत मुलींना शाळेत न पाठविण्याचा इशारा दिला. यावेळी अनिल चव्हाण यांनी सदरचे जबाब आणि निवेदन आयुक्तांपर्यंत पोहोचवून चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी उपआयुक्त दत्तात्रेय गोतिसे, नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, सदर विद्यार्थिनी व पालकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच आंदोलनाचा पवित्रा घेत मुख्याध्यापिका आणि प्रशासन अधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. (प्रतिनिधी)