शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘निरोगी आरोग्य व सुरक्षित प्रवास’चा संदेश देणारी सायकल यात्रा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 16:20 IST

महाराष्ट्र पोलीस व वायुदलाच्यावतीने नाशिक येथून काढण्यात आलेली ‘निरोगी आरोग्य व सुरक्षित प्रवास’चा संदेश देणारी सायकल यात्रा बुधवारी वर्ध्यात दाखल झाली.

वर्धा - महाराष्ट्र पोलीस व वायुदलाच्यावतीने नाशिक येथून काढण्यात आलेली ‘निरोगी आरोग्य व सुरक्षित प्रवास’चा संदेश देणारी सायकल यात्रा बुधवारी वर्ध्यात दाखल झाली. या सायकल यात्रेत वायुदलाचे व पोलीस दलाचे असे एकूण 20 जवान सहभागी झाले असून हे जवान नाशिक-नागपूर व नागपूर-नाशिक असा एकूण 1,500 किमीचा अंतर अवघ्या दहा दिवसात पूर्ण करणार आहेत.

या सायकल यात्रेत नाशिक पोलीसचे दहा जवान सहभागी झाले आहेत. 22 फेब्रुवारीला नाशिक येथून निघालेल्या या सायकल यात्रेने धुळे, भुसावळ, अकोला, अमरावती नागपूर असा प्रवास करीत बुधवारी वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. सदर सर्व सायकलीस्टशी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी संवाद साधला. त्यानंतर पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी स्वत: या सायकलीस्टचा उत्साह वाढविण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय ते वर्धा शहर पोलीस ठाण्यापर्यंत यात्रेत सहभागी होऊन सायकल चालविली. 

शिवाय या सायकल यात्रेत प्रभारी पोलीस अधीक्षक (गृह) पराग पोटे, आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, वर्धेचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले आदींनी सहभागी होऊन ‘निरोगी आरोग्य व सुरक्षीत प्रवास’चा संदेश दिला. नाशिक येथून निघालेल्या या सायकल यात्रेत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील गिरमे, नंदु उगले, बाळकृष्ण वेताळ, सुदाम सांगळे, दिनेश माळी, किरण वडजे, संदीप भुदे, हर्षल बोरसे, एम.के. धुम, फुलचंद पवार तसेच देवळाली नाशिक वायुदलाचे संतोष दुबे, सुमित, नितीन पाटील, संजय, एस. ए. जाधव, रवींद्र, धीरज, मनजीत आदी सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. शहर पोलीस ठाण्याच्या आवारात या सायकलीस्टला पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी निरोप दिल्यानंतर सदर सायकलीस्ट पुढील प्रवासासाठी रवाना झालेत.

एसपी व एसडीपीओंनी चालविली सायकलऐरवी वातानुकुलीत कार अन् वातानुकुलीत  दालनात कामकाज करणाऱ्या पोलीस अधीक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना सायकल चालविण्याचे काम फायदे आहेत हे पटवून देण्यासाठी स्वत: सायकल चालविली. वर्धेतील सदर अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथून सायकलने शिवाजी चौक, सोशालिस्ट चौक असे मार्गक्रमण करीत वर्धा शहर पोलीस ठाणे गाठले. एसपीसह बडे पोलीस अधिकारी खुद्द सायकल चालवित असल्याने ही सायकल यात्रा बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :Nashikनाशिक