शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

बदापूर परिसरात बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 13:06 IST

येवला : तालुक्यातील बदापूर परिसरात बिबट्याने म्हशीच्या पारडूवर हल्ला करून त्याचा जीव घेतल्याची घटना घडली.

येवला : तालुक्यातील बदापूर परिसरात बिबट्याने म्हशीच्या पारडूवर हल्ला करून त्याचा जीव घेतल्याची घटना घडली.येथील रोकडोबा मंदिर परिसरात बदापूर शिवारातील बिबट्याचा वावर असल्याच्या पाऊल खुणा दिसल्याने दहशतीचे वातावरण होते. अशातच सोमवारी बदापूर रस्त्यावरील रोकडोबा मंदिर परिसरात सुनील अंबादास घिगे या शेतकऱ्याच्या वस्तीवर बिबट्या येऊन गेला. झोपेत असतांना म्हशीच्या गोठ्यात पहाटेच्या सुमारास रेकण्याचा आवाज घिगे यांना आला. तेंव्हाच एका बिबट्याने म्हशीच्या पारडूला आपले भक्ष केले. म्हशीचे दूध काढण्यासाठी आल्यावर हा प्रकार लक्षात आला.दरम्यान प्रस्तुत लोकमत प्रतिनिधीने वनविभागाशी संपर्क साधला. वन अधिकारी पवार यांनी घटनास्थळी दुपारच्या सुमारास भेट दिली.दरम्यान, परिसरात चिखलात बिबट्याच्या पायाचे ठसे असल्याचे लक्षात आले.रोकडोबा परिसराजवळ आता मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे. येवला शहराचाच हा एक भाग आहे.-----------------------वृक्षांची तोड झाली, जंगलं नष्ट होत आहेत. त्यामुळे बिबटे आता अन्न पाण्यासाठी आपलं मूळ घर (जंगल)सोडत आहे.याला माणूसच जबाबदार आहे. आता मानवी वस्तीला संरक्षण देण्यासाठी आणि बिबट्याला जंगलात सोडण्यासाठी परिसरात पिंजरा लावावा.-सुभाष पहिलवान, पाटोळे, शेतकरी

टॅग्स :Nashikनाशिक