ठळक मुद्देउदय सांगळे यांनी नवीन इमारतचे खोदकाम सुरू करण्यात आले.
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथील प्राथमिक शाळा येथे नवीन इमारत भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजाभाऊ वाजे होते. त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी उदय सांगळे यांनी नवीन इमारतचे खोदकाम सुरू करण्यात आले. यावेळी क्रांतिवीर वसंतराव नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, पांडुरंग केदार, पंचायत समिती सभापती शोभा बर्के, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार व सरपंच मनिषा यादव, उपसरपंच विष्णू सांगळे, मुख्याध्यापक जालिंदर आढाव, शिवाजी घुगे, राजेंद्र वाघ, गोटीराम सांगळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय केकाणे यांनी तर आभारप्रदर्शन विष्णू सांगळे यांनी मानले.