शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात देवमामलेदारांच्या स्मारकाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:52 IST

सटाणा : शहराचे ग्रामदैवत दैवत संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारकाच्या भूमिपूजन समारंभासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बुधवार, ३ फेब्रुवारी रोजी सटाणा दौऱ्यावर येत असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.

ठळक मुद्देराज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम

सटाणा : शहराचे ग्रामदैवत दैवत संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारकाच्या भूमिपूजन समारंभासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बुधवार, ३ फेब्रुवारी रोजी सटाणा दौऱ्यावर येत असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.यासंदर्भात नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यपाल कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेवून ३ फेब्रुवारी रोजीची नव्याने वेळ मिळाली आहे. संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारक भूमिपूजन समारंभासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पालकमंत्री छगन भुजबळ हे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री दादाजी भुसे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनुपरे, माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खा. डॉ. सुभाष भामरे, आ. दिलीप बोरसे, नगरविकास सचिव महेश पाठक, नगरपरिषद संचालक किरण कुलकर्णी, पर्यटन विभागाच्या संचालक वल्सा नायर, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. धनजंय सावळकर, नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे प्रमुख उपस्थितीत स्मारकाचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे उपनगराध्यक्ष राकेश खैरनार, नगरसेवक महेश देवरे, नितीन सोनवणे, गटनेते रा.कॉ पार्टी, दिनकर सोनवणे, मनोहर देवरे,मुख्याधिकारी हेमलता डगळे आदी उपस्थित होते.सोहळ्याची जय्यत तयारीभुमिपुजन सोहळा झाल्यानंतर नजीकच असलेल्या दगाजी सिनेमा पॅलेस येथे मुख्यसमारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभुमीवर शहरात पालिका व प्रशासनाने व देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ट्रस्ट ने जय्यत तयारी सुरू करण्यात आली असुन न भुतो न भविष्यती असा हा नयनरम्य सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचे ट्रस्ट चे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी स्पष्ट केले.सुरगाण्यातही राज्यपाल येणारसुरगाणा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ३ फेब्रुवारी महिन्यात सुरगाणा तालुक्यातील भोरमाळ व भिंतघर येथे भेट देणार असल्याने दौऱ्याआधी या ठिकाणी तयारीला वेग आला आहे. तालुक्यातील भोरमाळ येथे काजू प्रक्रिया उद्योग सुरू झाला आहे. या माध्यमातून परिसरातील महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, बचत गटातील महिला सदस्य यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नवा रोजगार मिळाल्याने येथील अर्थचक्र सक्रिय राहिले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील पहिले गुलाबी गाव अशीही या गावाची ओळख आहे. या गावात मुलींच्या सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी घराच्या भिंती गुलाबी रंगाने रंगविल्या आहेत. तसेच या ठिकाणी देशी गोशाळा सुरू करण्यात आली आहे. या गोशाळेत परिसरातील बचत गटाच्या महिला, मुलींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच गाईंचे शेण, गोमूत्र यापासून १९ प्रकारची औषधे तयार करण्यात येत आहेत. याशिवाय गवरी किंवा अन्य सामान तयार करण्यात येत असून त्या ठिकाणाहून त्याचे विपणन होत आहे. राज्यपाल आपल्या दौऱ्यात या दोन्ही केंद्रांना भेट देणार आहेत.

टॅग्स :TempleमंदिरGovernmentसरकार