शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांच्या सरबत्तीने अधिकाऱ्यांची घाबरगुंडी

By श्याम बागुल | Updated: August 24, 2018 16:01 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत भुजबळ यांनी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी आणून गंगापूर धरणावर आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या ४८ दर्जेदार बोटी आणल्या होत्या त्या कुठे आहेत अशाी विचारणा केल्यावर त्यांना कोणीही उत्तर दिले नाही. अखेर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी काही अधिका-यांना

ठळक मुद्देमोर्चा काढण्याचा इशारा : कामकाजाबाबत नाराजी बोटी चोरीला गेल्या असतील तर गुन्हे दाखल करा

नाशिक : जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत दिड महिन्यांपुर्वी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिका-यांची बैठक घेवून प्रश्नांची सरबत्ती केली. बोटक्लबच्या बोटी, मांजरपाड्याचे रखडलेले काम, रस्त्यांची झालेली दुरावस्था, टॅँकर देण्यास होणा-या विलंबाबाबत भुजबळ यांनी विचारणा केली असता भांबावलेल्या अधिका-यांनी कसे बसे उत्तरे देवून मान सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासन व्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त करीत थेट प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत भुजबळ यांनी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी आणून गंगापूर धरणावर आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या ४८ दर्जेदार बोटी आणल्या होत्या त्या कुठे आहेत अशाी विचारणा केल्यावर त्यांना कोणीही उत्तर दिले नाही. अखेर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी काही अधिका-यांना फोन करून माहिती घेतली व १२ बोटी असल्याचे सांगितले. परंतु उर्वरित बोटी कुठे आहेत याचे उत्तर मिळत नसल्याचे पाहून भुजबळ यांनी, बोटी चोरीला गेल्या असतील तर गुन्हे दाखल करा अशी सुचना केली. बोट क्लब, कलाग्रामसारख्या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता, हा सरकारी पैसा आणि वेळेचा अपव्यय नाही का अशी विचारणाही त्यांनी केली.जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकर वेळेवर दिले जात नाही, प्रमुख व जिल्हा मार्गावील रस्त्याची दुरावस्था झाली असून, बॅँकाकडून पीक कर्ज मिळत नसल्याने शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यावर भुजबळ यांनी अधिका-यांना विचारणा केली. तसेच मांजरपाडा, बोटक्लब, कलाग्राम यासह रखडलेल्या प्रकल्पांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील रस्त्याची दुरावस्था झाली असून महामागार्वर दोन दिवसांपूर्वी खड्यात पडून तरूणाचा मृत्यू झाल्याचे उदाहरण देत भुजबळ यांनी, रस्ते दुरुस्तीची मागणी केली. त्यावर बांधकाम विभागाच्या आधिका-यांनी पी-१ ते पी-५ असे रस्त्याचे प्रकार असून त्यांच्या वर्गीकरणाप्रमाणे दुरुस्ती होते. असे सांगण्याचा प्रयत्न केला, त्यावर भुजबळ यांनी तोपर्यंत लोकांनी काय करायचे अशी विचारणा केली. जिल्ह्यात रस्त्याची काय अवस्था आहे, याची माहीती घ्या. मी बांधकाम विभागाचा मंत्री होतो त्यामुळे रस्त्याचे नियम तुम्ही मला सांगणार का, अशा शब्दात अधिका-यांना सुनावले. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्यासह विविध विभागाचे आधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक