शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांच्या येवल्यातही फटाके लागले फुटू...!

By किरण अग्रवाल | Updated: June 23, 2019 01:29 IST

भुजबळ यांना येवल्याचा रस्ता दाखविणाऱ्या माणिकराव शिंदे यांनी विधानसभेसाठी पुन्हा दंड थोपटून भुजबळांकडेच उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे भुजबळ माघारी फिरतील अशी शक्यता नसली तरी राजकीय वातावरण बदलते आहे याचा संकेत यातून घेता यावा. कारण तो येवल्यातच नव्हे, नांदगावातही राजकारण ढवळू शकणारा आहे.

ठळक मुद्दे माणिकराव शिंदे यांच्या आमदारकीच्या अपेक्षांना नव्याने फुटले धुमारे आता घड्याळाचे काटे कसे फिरतात याची उत्सुकता समीर भुजबळ यांच्या पराभवानंतर येवल्यातील गणिताची फेरमांडणी

सारांशदिवाळी उलटून गेल्यानंतर पडून राहिलेले फटाके उशिराने अगर पुढच्या दिवाळीला फोडायला घेतले तर ते सादडलेले निघण्याचा धोका असतो. पण राजकारणात पडून राहिलेले असोत, की नवीन; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सारे फटाके फुटणारेच निघतात, कारण भविष्यकालीन अपेक्षांबरोबर भूतकालीन अपेक्षाभंगाचा दारूगोळा कधी सादळत नसतो. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुजबळांच्या येवल्यात जे राजकीय फटाके फुटू लागले आहेत, त्याकडे याच संदर्भाने बघता येणारे आहे.लोकसभा निवडणुकीतील समीर भुजबळ यांच्या पराभवानंतर येवल्यातील गणिताची फेरमांडणी करून बघण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तेथील भुजबळ समर्थक अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी छगन भुजबळ यांना आता थांबण्याचा सल्ला देत आपल्याला उमेदवारी देण्याची अपेक्षा एका जाहीर विनंती पत्राद्वारे व्यक्त केली आहे. २००४मध्ये याच माणिकरावांनी भुजबळांना येवल्याचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर २००९ मध्ये तेच भुजबळांविरुद्ध शिवसेनेतर्फे लढून पराभूत झाले व पुन्हा भुजबळांच्या साथीला गेले. परंतु आता अपेक्षावजा उपेक्षेचा फटाका त्यांनी फोडून दिल्याने येवल्यातीलच नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकीय परिघावरील वातावरण तापून जाणे स्वाभाविक ठरले आहे.मुळात माणिकराव शिंदे यांची आमदारकीची अपेक्षा लपून राहिलेली नाही. तालुक्यातील राजकीय शह-काटशहाचा भाग म्हणून, स्वत:च कबूल केल्याप्रमाणे अनेकांचे राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी भुजबळांना त्यांनी येवल्यात आणले; परंतु ते करताना त्यांच्या स्वत:च्या पदरात काही पडू शकले नाही. बघता बघता तीन पंचवार्षिक टर्म निघून गेल्या, दरम्यानच्या काळात शिंदेंचे स्पर्धक राहिलेले नरेंद्र दराडे शिवसेनेत जाऊन आमदारही बनले शिंदे आपले भुजबळ समर्थक म्हणून आहे तिथेच राहिले.शिंदे यांचे दु:ख वा अपेक्षाभंग असा की, आश्वासन लाभूनही त्यांना विधान परिषदेत प्रतिनिधित्वाची संधी मिळाली नाही. एकदा नव्हे तर दोनदा असे झाले. त्यामुळे त्याबाबतची सल त्यांना बोचणे स्वाभाविक आहे. बरे, इकडे भुजबळ परतण्याची शक्यता नाही, आणि पुन्हा परपक्षात जाऊन बंडाचे निशाण फडकवायचे तर, तिथे जागा अगोदरच बुक झालेली. शिंदे यांना भुजबळांनाच विनंती करण्याची वेळ आली ती त्यामुळेच. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, ते भुजबळ समर्थक असतील तर वैयक्तिक विनंती करण्याऐवजी पत्रोपचाराचा प्रदर्शनीपणा करण्याची गरज त्यांना का भासली असावी? भुजबळांना खासगीत भेटून शिंदे आपली इच्छा बोलून दाखवू शकले असते; पण ते ऐकले जाईल याची खात्री नसल्याने व भुजबळांकडून दिले गेलेले आश्वासन पाळले न गेल्याचाच पूर्वानुभव असल्याने शिंदे यांनी आपल्या इच्छेचे जाहीर प्रकटीकरण केले. त्यामुळे ते बदलत्या राजकीय समीकरणात वेगळ्याच संकेतांची नांदी घडविणारे ठरू शकते.महत्त्वाचे म्हणजे राजकीय वातावरण बदलले आहे. लोकसभा निवडणुकीत मागे पडल्याने विरोधी पक्षात म्हणावा तितका त्राण उरलेला दिसत नाही. लोकसभेच्या नाशिकच्या जागेवर भुजबळांना लागोपाठ दुसऱ्यांदा पराभव बघावा लागला आहे. येवल्यात भुजबळांचेच समर्थक राहिलेले दराडे बंधू आता आमदार आहेत त्यांच्यासाठी शिंदे यांनी परिश्रम घेतलेले लपून राहिलेले नाही. मारोतराव पवारही शिवसेनेच्या पाठीशी आहेत. अंबादास बनकर यांनी जणू राजकीय सेवानिवृत्ती घेतली आहे. मग भुजबळांसोबत उरले कोण? अर्थात, एके क करत नेते बाजूला होत असले तरी मतदारांचे बळ मात्र आपल्याच सोबत राखण्यात भुजबळ कसर ठेवणार नाहीत; पण म्हणून बदलत्या समीकरणांकडे त्यांनाही दुर्लक्ष करता येऊ नये. शिंदे यांनी आपले अपेक्षापत्र जाहीर केल्यानंतर भुजबळ यांनी केलेल्या येवला तालुका दौºयात काही ठिकाणी शिंदे समर्थकांनी त्यासंदर्भातली निवेदनेही दिली आहेत. याला बंडाची नांदी भलेही म्हणता येऊ नये; परंतु समर्थक राहून विरोधात वावरणाºयांचे लोण वाढणार असेल तर ते शेजारी पंकज भुजबळ प्रतिनिधित्व करीत असलेल्या नांदगावातही पोहोचू शकते. त्यामुळे राजकीय बांधबंदिस्तीकडे भुजबळांना लक्ष पुरविणे गरजेचे बनले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसChagan Bhujbalछगन भुजबळElectionनिवडणूकSameer Bhujbalसमीर भुजबळ