विधानसभा निवडणूका जवळ येत असताना व राजकीय वातावरण तापले असताना भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेचेही वादळ सुरू झाले आहे. त्यांनी मी येथेच असल्याचे वक्तव्य करताना शिवसेनेत जाणार नसल्याबाबत कधी ठामपणे इन्कारही न केल्याने भुजबळ हे शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादीतच राहणार, याबाबत कार्यकर्ते संभ्रमात आहेत. येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील विंचूर सह अनेक गावात विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या भुजबळांना विंचूर येथील शिवसैनिकांनी भेटून शिवसेनेत प्रवेश करावा, अशी गळ घालित भगवी शाल देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी दिवंगत ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले असता, सर्व पक्षातील पदाधिकारी या ठिकाणी विविध विकासकामांच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यासाठी आले असल्याचे सांगत, भुजबळ यांनी याविषयी जास्त बोलणे टाळले. त्यामुळे भुजबळ शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादीतच राहणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.
भुजबळ यांना शिवसेना प्रवेशासाठी विंचूरच्या कार्यकर्त्यांनी घातली गळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 18:39 IST