नाशिक : राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेले आरोप चुकीचे असून, भुजबळ यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीने नव्हे तर भाजपाने मागील काळात केलेल्या आघाडी सरकारमधील मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपात तथ्य आढळल्यानेच केली आहे. शिवाय न्यायालयाने आदेश देऊन ईडी विभागाच्या चौकशीस सहकार्य करीत नसल्यानेच माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करण्यात आल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केला आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या दानवे यांनी सकाळी भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हा दावा केला. छगन भुजबळ व पुतण्या समीर भुजबळ आणि पुत्र पंकज भुजबळ यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीने केलेली नाही. मागील आघाडी सरकारच्या काळात अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात राहून त्यांच्या विभागात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यात दाखल पुरावेही दिले होते. तसेच एका खासगी स्वयंसेवी संघटनेने न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे.
चौकशीत सहकार्य न केल्यानेच भुजबळ अटकेत : रावसाहेब दानवे
By admin | Updated: February 3, 2016 00:03 IST