शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूबाबाच्या दोघा साथीदारांना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 01:28 IST

एका गरीब महिलेला फूस लावून नाशिकला आणले व झटपट श्रीमंत करण्यासाठी पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून संशयित भोंदू विनोदबाबा याने या महिलेवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले. या गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी रविवारी (दि.११) बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देतिघे फरार : भोंदूबाबाला गजाआड करण्याचे आव्हान

गंगापूर : एका गरीब महिलेला फूस लावून नाशिकला आणले व झटपट श्रीमंत करण्यासाठी पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून संशयित भोंदू विनोदबाबा याने या महिलेवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले. या गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी रविवारी (दि.११) बेड्या ठोकल्या.या प्रकरणात गुन्हा दाखल असलेला संशयित राजेंद्र दामोदर गायकवाड (५३, रा. आंबे जानोरी), अशोक ऊर्फनाना पिराजी पवार (रा. ओझर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी भोंदूबाबा अद्याप फरार असून, त्याचे तिघे साथीदारही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. याप्रकरणी पीडित महिलेने गंगापूर पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. मागील वर्षभरापासून भोंदूबाबा ध्रुवनगर भागातील एका अपार्टमेंटमध्ये पीडित महिलेसह राहात होता. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या महिलेला पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष संशयित भोंदूबाबा याच्यासह त्याच्या साथीदारांनी दाखविले. या आमिषाला बळी पडलेल्या महिलेस शिर्डी, सापुतारा येथे घेऊन जात पूजा केली. तसेच भोंदूबाबाने महिलेसोबत लग्न केल्याचे भासवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा बेकायदेशीररीत्या गर्भपात केला. याप्रकरणी पीडितेने गंगापूर पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरोधात बलात्कार, फसवणुकीची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार संशयितांमध्ये भोंदूबाबासह एका महिलेचा समावेश आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक