भोंगळे रस्त्यावरील अतिक्रमणे लवकरच काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:03 AM2020-11-24T00:03:54+5:302020-11-24T02:16:15+5:30

नांदगाव : भोंगळे रस्त्यावरील अतिक्रमणे नगर परिषदेने प्रथम हटवावी त्यानंतर रेल्वे प्रशासन भोंगळे रस्त्याशी संलग्न आपले बांधकाम करून देईल ...

Bhongale road encroachments will be removed soon | भोंगळे रस्त्यावरील अतिक्रमणे लवकरच काढणार

भोंगळे रस्त्यावरील अतिक्रमणे लवकरच काढणार

Next
ठळक मुद्देनांदगाव : आमदारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निघाला तोडगा




नांदगाव : भोंगळे रस्त्यावरील अतिक्रमणे नगर परिषदेने प्रथम हटवावी त्यानंतर रेल्वे प्रशासन भोंगळे रस्त्याशी संलग्न आपले बांधकाम करून देईल यावर मतैक्य होऊन गेले सहा महिने सुरू असलेला तिढा संपण्याची चिन्हे दृष्टिपथात आली असून, नांदगावकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

भुयारी मार्गावर (सब वे) सहा मीटरचा अरुंद रस्ता व त्यानंतर लगेचच आलेले काटकोनातले तीव्र वळण यामुळे अपघात होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. वळणावर पर्यायी सरळ रस्ता करून तो नगर परिषदेच्या हद्दीत भोंगळे रस्त्याला संलग्न करून द्यायला रेल्वे तयार होती. परंतु नगर परिषदेसमोर अतिक्रमणे हटविण्याचा प्रश्न होता.
अतिक्रमणे हटविताना मटण मार्केट तोडावे लागेल हा मुद्दा प्रशासनाने संवेदनशील ठरवून कारवाई करण्याचे टाळले. त्यामुळे अतिक्रमणे हटविण्यासाठी गेलेले पथक व पोलीस कार्यवाही न करता माघारी फिरले. गेले काही महिने हा मुद्दा झारीतला शुक्राचार्य ठरला.

मटण मार्केटप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अपिलाची सुनावणी मंगळवारी (दि. २४) होणार आहे. दुसरीकडे रेल्वे फाटक बंद करून तयार करण्यात आलेला सब वे प्रश्नावर भीमशक्तीचे जिल्हा नेते मनोज चोपडे व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सानप यांनी सुरू केलेले उपोषण सोमवारी (दि.२३) आमदार सुहास कांदे व नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या हस्ते या बैठकीनंतर सोडण्यात आले.
फाटक बंदच्या निर्णयामुळे फाटकाबाहेरील औरंगाबाद व येवला रोड भागाकडील नागरिकांपुढे दैनंदिन संपर्काची समस्या निर्माण होणार आहे. पर्याय म्हणून स्वीकारण्यात आलेल्या सब वेच्या कामातील तांत्रिक त्रुटी व अन्य कारणांमुळे हा सब वे विवादग्रस्त झालाय. रेल्वे फाटकाला यापूर्वी पर्याय म्हणून बांधण्यात आलेला उड्डाणपूल दोन किलोमीटर लांब असल्याने चार किमीचा वळसा घालून नागरिकांना यावे लागते.

सब वे तयार करताना यंत्रणेने रहदारीची घनता लक्षात घेतली नसल्याने व त्यात तांत्रिक त्रुटी राहून गेल्याने परिषद व रेल्वे प्रशासन यांच्यातला समन्वयाचा अभाव प्रकर्षाने नागरिकांना जाणवला. आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी नगराध्यक्ष राजेश कवडे शिवसेनेचे नेते संतोष गुप्ता, प्रमोद भाबड, सागर हिरे, मनोज चोपडे, तहसीलदार उदय कुलकर्णी, रेल्वेचे अभियंता केदारे, मुख्याधिकारी पंकज गोसावी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल चोळके, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची बैठक पार पडली.
 

Web Title: Bhongale road encroachments will be removed soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.