शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
5
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
6
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
7
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
8
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
10
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
11
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
12
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
13
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
14
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
15
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
16
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
18
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
20
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...

भोजापूरचा गाळ उपसा रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:23 IST

सिन्नर : तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या भोजापूर धरणातील गाळ उपसा होण्यासाठी लोकसहभाग मिळत नसल्याने धरणातील गाळ वर्षांनुवर्षे वाढत आहे. गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्याची गरज केवळ बोलघेवडी ठरत असून, प्रत्यक्षात गाळ काढण्याचे काम सुरू होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. धरणातील टेकड्या व गाळ उपसून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसिन्नर : पाणी साठवण क्षमता वाढविण्याची कळकळ केवळ बोलण्यापुरतीच

 

 

सचिन सांगळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या भोजापूर धरणातील गाळ उपसा होण्यासाठी लोकसहभाग मिळत नसल्याने धरणातील गाळ वर्षांनुवर्षे वाढत आहे. गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्याची गरज केवळ बोलघेवडी ठरत असून, प्रत्यक्षात गाळ काढण्याचे काम सुरू होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. धरणातील टेकड्या व गाळ उपसून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याची गरज आहे.सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातून उगम पावणाºया म्हाळुंगी नदीवर भोजापूर धरण असून, सुमारे ३६५ दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता आहे. भोजापूर धरणावर परिसरातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. हे धरण परिसरासाठी वरदान ठरलेले आहे. धरणाची निर्मिती झाल्यापासून मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता तसेच टेकड्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत चालली होती. धरणातील गाळ काढण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. याबाबत ‘लोकमत’ने अनेकवेळा वृत्त प्रसिद्ध केले होते.गेल्या वर्षी आमदार राजाभाऊ वाजे यांनी प्रस्ताव करून मेरी संस्थेमार्फत धरणातील गाळाचे सर्वेक्षण केले होते. त्या अहवालात धरणात १३ लाख ६७ हजार ४२८ घनमीटर गाळ साचला आहे, म्हणजे १२ दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा कमी झाला असे नमूद करण्यात आले होते. आमदार वाजे यांनी पुढाकार घेऊन धरणातील गाळ काढण्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत तयारी केली होती. पाटबंधारे विभागाने सुमारे ४० लाख ८६ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून त्यास कार्यकारी अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिली होती. त्यानंतर गेल्या वर्षी गाळमुक्त धरण, जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या तालुकास्तर बैठकीत आमदार वाजे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता यांनी त्यास प्रशासकीय मान्यता दिली. सदरचे काम युवा मित्र, टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून केले जाणार होते. सदर कामाचा कार्यारंभ आदेशनिघाला होता. पहिल्या टप्प्यात धरणातून ३ लाख ६५ हजार ४७४ घनमीटर गाळाचा उपसा केला जाणार होता. भोजापूर धरणातील टेकड्या हटविल्यानंतर निश्चितच पाणी साठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. यासाठी लाभक्षेत्रातील नागरिक व शेतकºयांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गतवर्षी तालुक्यातील कोनांबे व ठाणगाव धरणातील गाळ लोकसहभागातून काढला आहे. या भागातील शेतकरी व नागरिकांनीसुद्धा यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. धरणातील गाळ व टेकड्या काढल्यानंतर ३० ते ४० दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता वाढू शकते.- एस. एस. गोंदकर, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभागलोकसहभाग नसल्याने अडली कामेगेल्या वर्षी धरणातील गाळ काढण्यासाठी युवा मित्र संस्थेने दोन पोकलेन व डंपर ही यंत्रसामग्री धरण क्षेत्रावर आणून ठेवली होती. गाळ उपसल्यानंतर शेतकºयांनी तो स्वखर्चाने आपल्या शेतात वाहून न्यायचा होता; मात्र गाळ वाहून नेण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने आठ दिवसानंतर यंत्रसामग्री अन्यत्र हलविण्यात आली. त्यानंतर गाळ उपशाचे काम अद्याप सुरू झाले नाही. लोकसहभाग नसल्याने धरणातील गाळ उपसा रखडला आहे. भोजापूर धरण तालुक्यातील सर्वात मोठे धरण असल्याने धरण गाळमुक्त करण्याचा आपला मानस आहे. पाण्याची पातळी वाढवून लाभक्षेत्रातील शेतकºयांना त्याचा फायदा होईल. भोजापूर धरणातील गाळ व टेकड्या काढण्यासंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. पहिल्या टप्प्यातील कामास गेल्या वर्षी सुरुवात होणार होती. आठ दिवस धरण क्षेत्रात यंत्रसामग्री उभी होती; परंतु शेतकरी व लोकसहभाग नसल्याने काम होऊ शकले नाही. गाळ वाहून नेण्यासाठी शेतकºयांनी पुढाकार घेतला पाहिजे.- राजाभाऊ वाजे, आमदार, सिन्नर