शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

टोर्इंगच्या दादागिरीला नागरिकांची ‘भीक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:16 IST

वेळ सायंकाळी साडेपाच़़़ ठिकाण महात्मा गांधी रोड़़ ताईची दुचाकी टोर्इंगवाल्यांकडून सोडविण्यासाठी सढळ हस्ते मदत करा अशी विनंती़़़ नागरिकांनी काही वेळात जमा केलेली मदतवजा भीक़़़़़ अन् या रकमेचा स्वीकार करणारे टोर्इंगवरील कर्मचारी, तर आम्हाला भीक नको, आम्ही काय भिकारी आहोत का? अशी विचारणा करणारा वाहतूक पोलीस़ हे दृश्य स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत असलेल्या नाशिकचे आहे असे सांगितल्यास कोणाचाही विश्वास बसणार नाही़ मात्र, ही शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे़

नाशिक : वेळ सायंकाळी साडेपाच़़़ ठिकाण महात्मा गांधी रोड़़ ताईची दुचाकी टोर्इंगवाल्यांकडून सोडविण्यासाठी सढळ हस्ते मदत करा अशी विनंती़़़ नागरिकांनी काही वेळात जमा केलेली मदतवजा भीक़़़़़ अन् या रकमेचा स्वीकार करणारे टोर्इंगवरील कर्मचारी, तर आम्हाला भीक नको, आम्ही काय भिकारी आहोत का? अशी विचारणा करणारा वाहतूक पोलीस़ हे दृश्य स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत असलेल्या नाशिकचे आहे असे सांगितल्यास कोणाचाही विश्वास बसणार नाही़ मात्र, ही शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे़शनिवारी (दि़२८) सायंकाळी महात्मा गांधीरोड टारगेट केलेल्या टोर्इंगच्या कर्मचाऱ्यांनी एका वकील महिलेची दुचाकी उचलून टोर्इंग वाहनात ठेवली़ वकील महिलेने जागेवरच पैसे देऊन वाहन सोडण्याची विनंती केली, मात्र शुक्रवारप्रमाणेच टोर्इंगवरील उर्मट कर्मचाºयाने या महिला वकिलासोबत हुज्जत घालून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला़ यामुळे संतप्त महिलेने वाहन उचलण्यापूर्वी तुम्ही उद्घोषणा का करीत नाहीत, असा सवाल केला़ यामुळे कर्मचारी इरेला पेटला व वाहन सीपी आॅफिसमधूनच घेऊन जा, अशी तंबी त्याने दिली़  पोलीस आयुक्त डॉ़रवींद्रकुमार सिंगल यांनी बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लागावी तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये या उदात्त हेतुने दुचाकी व चारचाकी वाहने उचलण्यासाठी टोर्इंगचा ठेका दिला़ मात्र, महात्मा गांधीरोड, सीबीएस यांसारखी महत्त्वाची ठिकाणे की जी जुन्या पोलीस आयुक्तालयापासून जवळ आहेत त्याच ठिकाणी टोर्इंग ठेकेदाराने लक्ष्य केंद्रित केले आहे़, तर या टोर्इंग वाहनावरील ठेकेदाराचे कर्मचारी अतिशय उर्मट असून महात्मा गांधी रोडवर मुलाला अ‍ॅडमिट करण्यापूर्वी एक्स-रे काढण्यासाठी आलेल्या महिलेस शिवीगाळ करण्याबरोबरच दुचाकीवरून ढकलून देण्याचा प्रकार शुक्रवारी (दि़२७) रात्री घडला होता़ यावेळी नागरिकांनी रास्ता रोको करून घोषणाबाजीही केली होती़  दरम्यान, टोर्इंग ठेकेदाराविरोधात नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत चालला असून, पोलीस आयुक्तांनी याबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले.नागरिकांवरही दादागिरीच्वकील महिलेसोबत टोर्इंग कर्मचाºयाची भाषा ऐकल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता या कर्मचाºयांनी नागरिकांवरही दादागिरी केली़ यामुळे नागरिकांनी टोर्इंगवाल्यांना दंडाचे पैसे देण्यासाठी अभिनव असे ‘भीक मांगो आंदोलन’ करून दहा-दहा, वीस-वीस रुपये देण्याची विनंती केली़ या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी तत्काळ या आंदोलनास प्रतिसाद दिला व दंडाचे पैसे जमा केले व टोर्इंग व्हॅनवरील वाहतूक पोलीस कर्मचाºयास देऊ केले़ महात्मा गांधी रोडवर सुमारे दीड तास हा प्रकार सुरूच होता, यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडीही झाली़ मात्र दंड वसुलीचे टारगेट असलेल्या पोलिसांना याचे काहीही देणे घेणे नव्हते़ अखेर सरकारवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आल्यानंतर यावर तोडगा निघाला़

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस