शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भेगू प्रकल्पामुळे २० गावांचा पाणीप्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 00:21 IST

कळवण :गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी अडवून कळवण तालुक्यात वळविण्यात येणाऱ्या भेगू प्रकल्पाच्या पाईप विमोचकातून दगड, धोंडे पाणबुड्याच्या साहाय्याने काढून पाणी सुरळीत करण्यात यांत्रिकी विभागाला यश आले. यामुळे परिसरातील २० गावांच्या सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देतळमोरीच्या दुरुस्तीत यांत्रिकी विभागाला यश

कळवण :गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी अडवून कळवण तालुक्यात वळविण्यात येणाऱ्या भेगू प्रकल्पाच्या पाईप विमोचकातून दगड, धोंडे पाणबुड्याच्या साहाय्याने काढून पाणी सुरळीत करण्यात यांत्रिकी विभागाला यश आले. यामुळे परिसरातील २० गावांच्या सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात कळवण तालुक्यातील ओतूरसह सिंचन योजनांच्या प्रश्नासंदर्भात आयोजित बैठकीत भेगू प्रकल्पात दरवर्षी पाणीसाठा जास्त असल्यामुळे पाईप विमोचक दुरुस्ती करता येत नसल्याचे कारण दिले जाते, याकडे आमदार नितीन पवार यांनी लक्ष वेधले होते. त्यावेळी पाटील यांनी युद्ध पातळीवर प्रश्न सोडवून आदिवासी भागातील पाणी प्रश्नाची सोडवणूक करण्याची सूचना पाटबंधारे विभागाला दिली होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर यांत्रिकी विभागाच्या यंत्रणेने पाणबुड्याच्या साहाय्याने मंगळवारी युद्धपातळीवर उपाययोजना करुन पाईप विमोचकातून दगड धोंडे काढून पाणी सुरळीत करण्यात यश मिळविले असून येत्या दोन ते तीन दिवसात प्रकल्पातील पूर्ण पाणी काढण्याचे यंत्रणेचे उद्दिष्ट आहे. दरम्यान मंगळवारी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी करुन सूचना दिल्या असून पाणी सुरळीत करण्यासाठी यंत्रणा प्रकल्पस्थळावर तळ ठोकून बसणार आहे.पाणी आवर्तन सोडण्यात येत नसल्याने पाणी असून पाण्याचा उपयोग होत नव्हता. एप्रिल, मे, जून महिन्यात पिकासाठी पाणी मिळत नव्हते. शेतकऱ्यांना सिंचन व पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने भीषण पाणीटंचाईचा सामना या भागातील जनतेला करावा लागतो. दरवर्षी पाणीसाठा जास्त असल्याचे कारण देत दुरुस्तीसाठी टाळाटाळ केली जात होती. दरवर्षी भेगू प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत नसल्याने दुरुस्ती करण्यास अडचणी येत होत्या. दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाच्या दुरुस्ती विभागाकडे सोपविण्यात आले असल्यामुळे त्याची दुरुस्ती होऊन सर्वांना पाणी मिळेल असा विश्वास पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने व्यक्त केला.राज्यातील पहिला प्रयोग २००० मध्ये यशस्वीगुजरात राज्यालगत कळवण तालुक्यात मांगलीदर पाड्याजवळ उगम पावणारी पश्चिम वाहिनी भेगू नदीचे गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी मांगलीदर गावाजवळ माजीमंत्री स्व. ए. टी. पवार यांनी १०० दशलक्ष घनफूट क्षमतेचे भेंगू लघु पाटबंधारे प्रकल्प बांधून अडविले. तेथून कालव्याद्वारे गिरणा खोऱ्यात पाणी वळवून पश्चिम वाहिनी नदीचे पाणी पूर्व वाहिनी करून त्या पाण्याचा २० गावातील आदिवासी बांधवांना लाभ मिळवून दिला आहे . गुजरातला वाहून जाणारे पाणी कळवण तालुक्यात वळवून आणण्याचा राज्यातील पहिला प्रयोग स्व. पवार यांनी सन २००० मध्ये यशस्वी केल्यानंतर २०१६ पर्यंत पाणी सुरळीत असल्यामुळे या भागाला पाण्याचे आवर्तन मिळत होते. जानेवारी २०१६ मध्ये ल.पा.प्रकल्पाच्या पाईप मुखाशी दरड कोसळल्याने पाईप विमोचकामधून पाणी येणे बंद झाले. पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाकडून तपासणी करून पाणबुड्याचा वापर करून पाणी सुरू करण्याचे प्रयत्न केले परंतु यश आले नव्हते. त्यामुळे या पाण्यापासून विरशेत ,मांगलीदर , चाफापाडा आदी २० गावातील आदिवासी बांधव वंचित झाल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली होती.फोटो - ०१ कळवण १

टॅग्स :talukaतालुकाwater scarcityपाणी टंचाई