शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

भावजयीचा फरार मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 16:38 IST

हनुमानवाडीतील मोरेमळा येथे मंगळवारी (दि.२) रात्री संशयित अनिल पाटील याने भावजयी ज्योती सुनील पाटील हिचा खून केला होता, तर मध्यस्थी करणाऱ्या भाऊ सुनीलवर देखील चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले

ठळक मुद्देसिडकोतील एका देशी दारू दुकानातून ताब्यात घेतले भाऊ सुनीलवर देखील चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : घरात नुसता बसून राहतो, कामधंदा करत नाही, काम करत जा असे सांगितल्याचा राग अनावर झाल्याने हातातील धारधार चाकूने भावजयीच्या छातीवर वार करून तिचा खून करत सख्ख्या भावावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणात दोन दिवसांपासून फरार असलेल्या अनिल पांडुरंग पाटील याला पंचवटी पोलिसांच्या गुन्हा शोध पथकाने सिडकोतील एका देशी दारू दुकानातून ताब्यात घेतले आहे.

पंचवटीतील हनुमानवाडीतील मोरेमळा येथे मंगळवारी (दि.२) रात्री संशयित अनिल पाटील याने भावजयी ज्योती सुनील पाटील हिचा खून केला होता, तर मध्यस्थी करणाऱ्या भाऊ सुनीलवर देखील चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले होते. संशयित आरोपी व त्याचा भाऊ, आई आणि भावजयी असे रामनगर येथे राहत असून, संशयित अनिल हा काही कामधंदा करत नव्हता, त्याला दारूचे व्यसन होते. त्यातून वाद होऊन त्याने भावजयीचा खून केला. संशयित अनिल पाटील हा सिडकोत फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना मिळाली त्यानुसार गुन्हा शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, हवालदार संजय वानखेडे, सुरेश नरवाडे, संदीप शेळके, महेश साळुंके, विष्णू जाधव आदींनी सिडकोत त्याचा शोध सुरू केला असता संशयित एका देशीदारूच्या दुकानात मद्यपान करत असल्याचे दिसून येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. संशयित अनिल याला काही वर्षांपूर्वी पंचवटी पोलिसांनी बॅटरी चोरी प्रकरणात अटक केली होती.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय