शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’चा भरवीर इगतपुरी तिसरा टप्पा झाला सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:39 IST

या वेळी मंत्री भुसे म्हणाले, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारकडून पायाभूत सुविधा प्रकल्पांना अग्रक्रम देण्यात आला आहे. 

नाशिक : विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्ह्यांच्या विकासाचा गेमचेंजर ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाचा  तिसरा टप्पा असलेल्या भरवीर ते इगतपुरी या २५ किलोमीटरचे लोकार्पण  व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.     अध्यक्षस्थानी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व आमदार हिरामण खोसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी मंत्री भुसे म्हणाले, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारकडून पायाभूत सुविधा प्रकल्पांना अग्रक्रम देण्यात आला आहे. 

महामार्गावर १८ कृषी समृद्धी केंद्रे करणार समृद्धी महामार्गावर १६ ठिकाणी डेव्हलपमेंट हब तयार करण्यात येणार आहे. यामध्ये इंडस्ट्रीयल हब, शेतकऱ्यांसाठी १८ कृषी समृद्धी केंद्रे तथा कृषी हब तयार करण्यात येणार आहेत. महामार्गामुळे पर्यावरणाच्या संतुलनासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. 

मुंबईची कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असून, भिवंडी येथे महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे, त्याचा बंदोबस्त करा, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग