शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

भरतनाट्यम नृत्याविष्काराने जिंकली मने उत्सव नृत्यसाधनेचा : ‘जय गणेश’मधून प्राणिप्रेमाचा दिला संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 1:24 AM

नाशिक : शक्तीस्वरूप देवीच्या आराधनेपासून तर जलबचतीचा संदेश देणाºया संकल्पनेवर आधारित सादर करण्यात आलेल्या विविध भरतनाट्यम नृत्याविष्काराने रसिकांची मने जिंकली.

ठळक मुद्देउपस्थितांची उत्स्फूर्त दादमानपत्र, दहा हजार रुपये रोख रक्कम प्रदान

नाशिक : शक्तीस्वरूप देवीच्या आराधनेपासून तर जलबचतीचा संदेश देणाºया संकल्पनेवर आधारित सादर करण्यात आलेल्या विविध भरतनाट्यम नृत्याविष्काराने रसिकांची मने जिंकली. निमित्त होते, नृत्यसाधना कला अकादमीच्या वतीने परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित ‘प्रगती उत्सव-२०१८’ या कार्यक्रमाचे. सृजनात्मक संकल्पनांची नृत्यप्रस्तुती यावेळी अकादमीच्या नृत्यांगनांनी सादर करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथून आलेल्या प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना कनकलता सुधाकर, उद्धव अहेर, विलास बिरारी, गंगाधर आमिन अकादमीच्या संचालक डॉ. संगीता पेठकर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते नटराज पूजन करून मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी अकादमीच्या शिष्यांनी ‘पुष्पांजली’ संकल्पनेवर अधारित पदन्यास नृत्य सादर केले. त्यानंतर अकादमीमध्ये खास ‘नृत्ययोगसूत्र’ या भरतनाट्यम नृत्याद्वारे शारीरिक-मानसिक संतुलन प्राप्त करण्याचा प्रयत्न करणाºया नृत्यांगनांनी हा आगळावेगळा नृत्यप्रकार रसिकांपुढे तेवढ्याच ताकदीने सादर केला. योग, आसन, प्राणायाम, हस्तमुद्रा, संगीत थेरपीचा अनोखा संगम या नृत्यप्रकारातून उपस्थितांनी अनुभवला. या नृत्यप्रकारात वैशाली अहिरे, शिल्पा कोतकर, मंजूषा बोडके, रूपाली शेट्टी, विलासिनी शेट्टी यांनी सहभाग घेतला. तसेच कार्यक्रमाचा समारोप ‘नदी’ संकल्पनेवर आधारित भरतनाट्यम नृत्यरचनेने करण्यात आला.‘वसुंधरेचा साज सांभाळा’वसुंधरा अर्थात पृथ्वी ही सर्व सजीवसृष्टीची असून यावर मानवाइतकाच सर्वांचा हक्क अन् अधिकार आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या वसुंधरेचे संवर्धन काळाची गरज आहे. प्राणी, पक्षी या मुक्या जिवांच्या संरक्षणासाठी नागरिकांनी पुढे यावे, असा संदेश देणारी ‘जय गणेश’ ही नृत्यरचना कनकलात सुधाकर व त्यांच्या शिष्यांनी खास शैलीत सादर केली. नृत्याविष्कार रंगात आला असताना अचानकपणे काही तांत्रिक अडचण उद्भवल्याने कलावंतांचा काही वेळ हिरमोड झाला. पाच मिनिटांनंतर तांत्रिक अडचण दूर झाली आणि पुन्हा जेथून नृत्यरचनेत व्यत्यय आला तेथून पुढे नृत्याविष्कार नृत्यांगनांनी तितक्याच उत्साहात आणि ताकदीने सादर केला. यावेळी गजमुख हत्तीसह, गोमाता व सर्प अशा विविध जिवांच्या हावभाव कलावंतांनी नृत्यामधून रंगमंचावर मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. नृत्यसाधना अकादमीच्या वतीने अ‍ॅड. सदाशिवराव देवे पुरस्काराने पुण्याच्या ज्येष्ठ नृत्यांगना प्रमद्वरा किट्टूर यांचा गौरव करण्यात आला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, दहा हजार रुपये रोख रक्कम प्रदान करण्यात आली.