शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
3
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
4
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
5
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
6
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
7
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
8
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
9
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
10
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
11
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
12
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
13
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
14
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
15
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
16
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
17
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
18
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
19
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
20
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव

भारतभ्रमंती : शहीद स्वाभिमान यात्रेचे तोफखाना केंद्रात स्वागत ‘राष्टÑपुत्र से हो सन्मान, मांग रहा हैं हिंदुस्तान...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:11 IST

नाशिक : ‘भारत माता की जय, शहीद जवान अमर रहें’चा जयघोष करीत ऐतिहासिक ‘शहीद स्वाभिमान यात्रा’ नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना कें द्रात दाखल झाली.

ठळक मुद्देतोफखाना दलाने या यात्रेचे जोरदार स्वागत केलेइंडिया गेटवर शहीद स्वाभिमान यात्रेला हिरवा झेंडा दाखवून पाठिंबा दिला

नाशिक : ‘भारत माता की जय, शहीद जवान अमर रहें’चा जयघोष करीत ऐतिहासिक ‘शहीद स्वाभिमान यात्रा’ नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना कें द्रात दाखल झाली. ‘राष्टÑपुत्र से हो सन्मान, मांग रहा हैं हिंदुस्तान’ हे ब्रीद घेऊन प्रवास करणाऱ्या यात्रेचे केंद्रातील वरिष्ठ अधिकाºयांनी स्वागत केले. यावेळी जवानांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. २९ राज्यांमधून ९९ दिवस १५ हजार किलोमीटरचा प्रवास करत भारतभ्रमंतीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर असलेल्या शहीद स्वाभिमान यात्रेचे बुधवारी (दि.४) रात्री नऊ वाजता तोफखाना केंद्रात आगमन झाले. भारतीय सैन्यदलातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तोफखाना दलाने या यात्रेचे जोरदार स्वागत केले. गुरुवारी (दि.५) सकाळी मेजर जनरल अशोक नरुला यांनी यात्रेला झेंडा दाखवत पुढील मार्गासाठी रवाना केले. यावेळी तोफखाना केंद्राचे जवान मोठ्या संख्येने प्रवेशद्वारावर उपस्थित होते. देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर वीरगती प्राप्त करणाºया शहीद जवानांच्या स्मृतींचे विस्मरण कालांतराने सरकारला पडते. त्यामुळे शहिदांच्या कुटुंबीयांना सर्वत्र संघर्ष करावा लागतो. शहिदांच्या कुटुंबीयांना समाज व सरकारकडून सन्मान मिळावा, या मुख्य उद्देशाने सर्वसामान्य १८ नागरिकांनी दिल्लीमध्ये एकत्र येत सुरेंद्रसिंह बिधुडी यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्वाभिमान देश का’ या संघटनेची स्थापना के ली. २३ मार्च २०१८ रोजी भारतीय लष्करप्रमुख विपीन रावत यांनी दिल्ली येथील इंडिया गेटवर शहीद स्वाभिमान यात्रेला हिरवा झेंडा दाखवून पाठिंबा दिला. ही यात्रा मध्य प्रदेशमधील भोपाळ, इंदूरमार्गे नाशिकमध्ये पोहचली होती. सकाळी शहरातून यात्रा मुंबईच्या दिशेने रवाना झाली. यात्रेमध्ये सहभागी वाहनावर आकर्षक पद्धतीने शहीद भगतसिंग, शहीद चंद्रशेखर आझाद, शहीद राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची छायाचित्रे सजविण्यात आली आहेत.साडेतीन हजार कि.मी.चा प्रवास पूर्ण२३ मार्च रोजी सुरू झालेली शहीद स्वाभिमान यात्रा दिल्लीहून राजस्थान राज्यात दाखल होऊन उदयपूरमार्गे गुजरात राज्यात ३१ मार्च रोजी पोहचली. अहमदाबाद येथून यात्रा उज्जैनमार्गे मध्य प्रदेश राज्याच्या सीमेतून प्रवास नाशिकमध्ये दाखल झाली. यात्रेचा एकू ण साडेतीन हजार कि.मी.चा प्रवास पूर्ण झाला आहे. यात्रा १० एप्रिल रोजी पुण्यात दाखल होणार आहे. यात्रेचा समारोप पंजाब राज्यातून मार्गक्रमणानंतर २४ जून रोजी दिल्लीच्या इंडिया गेटवर होणार आहे.असे आहे ‘मिशन’शहीद स्वाभिमान यात्रेचे प्रमुख मिशन म्हणजे शहीद भगतसिंग यांना देशाचे राष्टÑपुत्र म्हणून सन्मान द्यावा. तसेच देशाच्या सर्व शहिदांना सर्वोच्च सन्मान द्यावा. शहीद भगतसिंग यांची मोठी प्रतिमा उभारण्याचे लक्ष्य. त्यासाठी देशाच्या प्रत्येक राज्यामधून माती संकलित करणे. याबरोबरच शहीद संस्थांची स्थापना करण्याचा मानस. राष्टÑाच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या सैनिक, अर्धसैनिक व पोलिसांना एकसमान स्वरूपात सन्मान द्यावा. त्यांच्या कुटुंबीयांना सर्वसमान सुविधांचा लाभ द्यावा. तसेच ‘शहीद स्वाभिमान कार्ड’ देऊन त्यांचा सन्मान सरकारने करावा, अशा प्रमुख मागण्यांचे मिशन घेऊन यात्रा मार्गक्रमण करीत असल्याची माहिती यात्रेचे समन्वयक संतोष सिंह यांनी दिली.