शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

भाम धरणाला गळती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 18:06 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते गावाजवळ भाम नदीवर नव्यानेच बांधण्यात आलेल्या भाम धरणात यावर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊ लागल्याने पुनर्वसितात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस पथकाने या गळतीची पाहणी करून गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेतून इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते येथे भाम धरण बांधण्यात आले आहे. या धरणात यावर्षी पूर्णपणे पाणीसाठा करण्यात आल्याने हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मात्र या धरणाच्या मुख्य सांडव्याच्या अंतर्भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने हे पाणी सिमेंटच्या सांडव्याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात साचत असल्याने हे पाणी विजेच्या मोटारीने बाहेर काढण्यात येत आहे. दरम्यान या गळतीची माहिती स्थानिक नागरिकांनी घोटी पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ नये यासाठी कर्मचारी गणेश सोनवणे, रविराज जगताप आदींच्या पथकासह धरणाच्या गळतीची पाहणी केली .या गळतीमुळे भविष्यात धरणाच्या खाली पुनर्वसन केलेल्या नागरिकांना धोका निर्माण होणार नाही यासाठी गळती रोखा अशा सूचना केल्या आहेत.इन्फो...सांडव्याच्या पोकळीत साठते पाणीपंतप्रधान सिंचन योजनेतून तयार झालेले लेडीज टीएमसी क्षमतेच्या या धरणात आरंभीच्या काळात धरणाची क्षमता पाहण्यासाठी निम्म्याहून कमी पाण्याचा साठा करणे गरजेचे होते.मात्र शासनाने पहिल्याच वर्षी पूर्णपणे साठा केल्याने धरणाला गळती होईल याची कल्पना प्रशासनाला आली नाही.परिणामी मुख्य सांडव्याच्या अंतर्भागात असलेल्या पोकळीत मोठ्या प्रमाणात गळतीमुळे पाणी साचत असल्याने हे पाणी नियमित काढले नाही तर हा सिमेंटचा कालवा पाण्याच्या दाबामुळे फुटून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान हे पाणी काढण्यासाठी दोन विजेचे पंप बसविले असून या पंपाद्वारे अखंडपणे पाणी बाहेर काढण्यात येत आहे.पुनर्वसितात भीतीचे सावटदरम्यान या धरणाच्या कामासाठी बुडीत क्षेत्रात गेलेल्या भरवज, निरपण या गावासह काळूस्ते गावाच्या दरेवाडी, सारु कतेवाडी, बोरवाडी या गावाचे पुनर्वसन धरणाच्या बांधाखाली केले आहे.भविष्यात ही गळती चालूच राहिली तर सर्वाधिक फटका या पुनर्वसित गावांना बसणार असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

टॅग्स :Damधरण