शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

साळी समाजाचे आद्य दैवत भगवान जिव्हेश्वर पालखी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:47 IST

साळी समाजाचे आद्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर महाराज यांचा जयंती सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. नाशिक शहर स्वकुळ साळी समाज पंचमंडळ व श्री जिव्हेश्वर युवक उत्कर्ष संस्था यांच्यातर्फे जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : साळी समाजाचे आद्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर महाराज यांचा जयंती सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. नाशिक शहर स्वकुळ साळी समाज पंचमंडळ व श्री जिव्हेश्वर युवक उत्कर्ष संस्था यांच्यातर्फे जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  सकाळी सहा वाजता जुने नाशिक साळी वाडा येथील जिव्हेश्वर मंदिरात जयंती उत्सवास सुरुवात झाली. त्यावेळी साळी समाज महिला मंडळाने भगवान जिव्हेश्वरांची विधिवत पूजा करून सकाळी ९ वाजता फुलांची आकर्षक सजावट करून श्री भगवान जिव्हेश्वरांची पालखी सोहळा व शोभायात्रा सुरू झाली. जुने नाशिकमार्गे शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा नेण्यात आली. यात सर्वात लक्षवेधी विविध देवदेवता, सिंह, वृषभ यांचे विविध प्रकारचे नृत्य मिरवणुकीचे आकर्षण ठरले. प्रत्येक चौकात पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी व शोभायात्रा जुने नाशिक संभाजी चौकातील श्री गणपती मंदिरात येऊन सांगता झाली. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पंचमंडळाचे अध्यक्ष मोहन गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुनील साळी, युवाध्यक्ष सचिन कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी या उत्सवाचे संयोजन केले.  भगवान जिव्हेश्वर यांचा जन्म झाला त्यावेळेस श्रावण शुद्ध ही तिथी असल्यामुळे हा दिवस जन्म उत्सवासाठी मानला जातो. याबाबत अशी अख्यायिका आहे की, संसाराची निर्मिती झाल्यावर लज्जा रक्षणासाठी सर्व देवदेवता यांनी भगवान शंकराकडे याबाबत आपली व्यथा व्यक्त केली. त्यावेळेस भगवान शंकराने आपल्या जिव्हेद्वारे (जीभेतून) भगवान श्री जिव्हेश्वर यांची निर्मिती केली. त्यामुळे त्यांचे नाव जिव्हेश्वर झाले. त्यामुळे वस्त्रोद्योगाचे आद्यप्रवर्तक म्हणूनही भगवान जिव्हेश्वरांना ओळखले जाते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक