शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासघात दिवस पाळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:07 IST

धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करीत २९ जुलैला ‘विश्वासघात दिवस’ पाळून लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देधनगर समाजाचे आंदोलन : फसवणूक झाल्याचा आरोप

नाशिक : धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करीत २९ जुलैला ‘विश्वासघात दिवस’ पाळून लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिली आहे.नाशिक येथे शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (दि.१९) पत्रकार परिषदेत धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाविषयी माहिती देताना विक्रम ढोणे यांनी सरकाने आश्वासन देऊन ते पाळण्यास टाळाटाळ करून समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला. राज्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर एसटी आरक्षणाचे मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाचा केंद्र्रबिंदू पुणे जिल्ह्यातील ‘बारामती’ होता. १५ जुलै २०१४ रोजी पंढरपूर ते बारामती या आरक्षण पदयात्रेला सुरुवात झाली. २१ जुलैला ही यात्रा बारामतीत पोहचली आणि आमरण उपोषणाला सुरू झाल्यानंतर २९ जुलैला हे उपोषण सोडवण्यासाठी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीला येऊन आपण सर्व अभ्यास करून आल्याचे सांगत सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या आवाहनानुसार आंदोलकांनी उपोषण सोडले.सरकारने शब्द पाळला नाहीफडणवीस सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. धनगर समाजाची फसणूक केली, असा आरोप करतानाच ज्या दिवशी आरक्षण लढ्यातील आंदोलकांनी फडणवीस यांच्या आश्वासनामुळे उपोषण सोडले तो दिवस संपूर्ण राज्यातील धनगर समाज ‘विश्वासघात’ दिवस म्हणून पाळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकreservationआरक्षण