शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच लाख शेतकऱ्यांना होणार मदतीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:37 IST

नाशिक : दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाºया शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा जिल्ह्यातील अंदाजे साडेपाच लाख शेतकºयांना लाभ होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने महसूल, कृषी खात्याने अल्पभूधारक शेतकºयांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन आठवड्यांत सदरची माहिती केंद्र सरकारकडे आॅनलाइन सादर केल्यानंतरच शेतकºयांना पहिला हप्ता दिला जाणार आहे.

ठळक मुद्देशेतकरी स्वाभिमान योजना : आजपासून गाव मेळावे

 

 

नाशिक : दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाºया शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये मदत देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा जिल्ह्यातील अंदाजे साडेपाच लाख शेतकºयांना लाभ होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने महसूल, कृषी खात्याने अल्पभूधारक शेतकºयांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन आठवड्यांत सदरची माहिती केंद्र सरकारकडे आॅनलाइन सादर केल्यानंतरच शेतकºयांना पहिला हप्ता दिला जाणार आहे.केंद्र सरकारने ज्या कुटुंबाकडे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकूण दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर केली असून, अशा कुटुंबाची गावपातळीवर माहिती गोळा करण्याच्या सूचना आहेत. नाशिक जिल्ह्यात आजवर ८५३ गावांची सुमारे ८० टक्के माहिती विविध माध्यमांतून संकलित करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने संगणकीय सातबारा, कृषी खात्याचे अ‍ॅग्रो सेन्सेक्स, नैसर्गिक आपत्तीची मदत वाटलेल्या शेतकºयांच्या यादीचा समावेश आहे. या उपरही कोणी राहून गेले असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून गुरुवार दि. ७ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत जिल्ह्यात गावनिहाय मेळावे घेण्यात येणार आहेत. ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकाºयांच्या प्रमुख उपस्थितीत होणाºया या मेळाव्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सामावून घेण्यात येणार आहे. गावनिहाय कुटुंबाच्या क्षेत्राची यादी तयार करून ती ग्रामपंचायतीत जाहीर करण्याबरोबरच वाचून दाखविली जाणार आहे. त्यात समावेश नसलेल्या शेतकºयांनी आपल्याकडील पुरावे सादर करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. यासाठी ग्रामसमितीही गठित करण्यात येणार असून, पात्र व अपात्र शेतकºयांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तयार झालेल्या यादीचे तहसीलदार, गटविकास, कृषी अधिकाºयांनी या यादीची सॅम्पल खात्री करावी, असेही शासनाने म्हटले असून, ही संपूर्ण यादी २६ फेब्रुवारीपर्यंत शासनाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण खातेदार पाहता, सुमारे साडेपाच लाख शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.चतुर्थ श्रेणीला लाभ; सेवानिवृत्त वंचितशासनाने या योजनेसाठी कोणाला अपात्र ठरवायचे याची विस्तृत माहिती दिली नसली तरी, शासकीय सेवेत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना मात्र त्यांच्याकडे दोन हेक्टरपर्यंत जमीन असेल तर लाभ मिळेल, मात्र सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाºयाला जर दर महिन्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळणार असेल तर तो या योजनेपासून वंचित राहणार आहे.