जळगाव नेऊर : पुरणगाव येथे श्रावण ठोंबरे व सोपान गाडे यांच्या गाय-गोठ्यांचे भूमिपूजन पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते पार पडले.
तालुक्यात आजवर ७५० लाभार्थ्यांना गाय-गोठ्यांचा लाभ दिला असून कुठलीही माहिती, अडचण, शंका असल्यास थेट पंचायत समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन सभापती गायकवाड यांनी केले. दरम्यान, नवीन कृती आराखडा बनविणे चालू असून जास्तीत जास्त लोकांनी नावनोंदणी करावी, असे ते म्हणाले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेश कांबळे, प्रहारचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, किरण चरमळ, उपसरपंच रामनाथ ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र ठोंबरे, श्रावण ठोंबरे, कल्पना ठोंबरे, रोजगार सेवक रहीम शेख, बापू ठोंबरे, शिवाजी खापरे, बापू थेटे, माधव ठोंबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
(०१ जळगावनेऊर)
येवला तालुक्यात पुरणगाव येथे गाय-गोठ्याचे भूमिपूजन करताना प्रवीण गायकवाड, हरिभाऊ महाजन, किरण चरमळ, श्रावण ठोंबरे, रामनाथ ठोंबरे.
020921\02nsk_43_02092021_13.jpg
येवला तालुक्यात पुरणगाव येथे गाय-गोठ्याचे भूमिपूजन करताना प्रवीण गायकवाड, हरिभाऊ महाजन, किरण चरमळ, श्रावण ठोंबरे ,रामनाथ ठोंबरे.