शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या मेनरोडवरील इमारतीला गोण्यांचा टेकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:48 IST

शहरात सुरू असलेल्या पावसामुळे आधीच जीर्ण होत चालेल्या महापालिकेच्या मेनरोड येथील कार्यालयाचा काही भाग कोसळल्यांनतर प्रशासनाने तातडीने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी सुरू केली आहे. तूर्तास वाळूच्या गोण्या भरून इमारतीच्या धोकादायक भागाला टेकू देण्यात येणार असून, पावसाळ्यानंतर नूतनीकरणाचे काम केले जाणार आहे.

नाशिक : शहरात सुरू असलेल्या पावसामुळे आधीच जीर्ण होत चालेल्या महापालिकेच्या मेनरोड येथील कार्यालयाचा काही भाग कोसळल्यांनतर प्रशासनाने तातडीने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी सुरू केली आहे. तूर्तास वाळूच्या गोण्या भरून इमारतीच्या धोकादायक भागाला टेकू देण्यात येणार असून, पावसाळ्यानंतर नूतनीकरणाचे काम केले जाणार आहे.महापालिकेची मेनरोडवरील इमारत ब्रिटिशकालीन आहे. ती काळ्या दगडात घडविलेली आहे. भूतपूर्व नगरपालिकेचे ते मुख्यालय होते. महापालिकेची स्थापना झाल्यानंतरदेखील काहीकाळ या कार्यालयातून काम चालले त्यानंतर महापालिकेचे मुख्यालय जुनी पंडित कॉलनी आणि राजीव गांधी भवनात चालले असले तरी या इमारतीतदेखील काही विभाग कायम आहेत. शिक्षण मंडळाचे कार्यालयदेखील याच ठिकाणी होते. आता या इमारतीत अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून, काही दगडे पडण्यास झाली आहेत. विशेषत: त्यावर झाडे उगवल्यानंतर दोन दगडांमधील अंतर वाढत गेले आणि दगडे पडण्याचा धोका अधिक वाढला आहे. सोमवारी (दि.२९) यातील काही दगडे पडल्याने पुन्हा इमारतीचा विषय चर्चेत आला असून, इमारतीचे स्थलांतर करण्यासाठी नगरसेवकांनी निवेदने दिली आहेत.महापालिकेने इमारतीला तातडीने आधार देण्यासाठी पुरातत्व विभागाची मदत घेऊन तेथे काम करणाऱ्या तज्ज्ञ वास्तुविशारदांची मदत घेतली आहे. योगेश कासार यांनी त्यानुसार इमारतीची प्राथमिक तपासणी करून महापालिकेला अहवालदेखील दिला आहे. इमारतीच्या बाह्य भागातील काही दगडे पडले असले तरी मूळ गाभा सुस्थितीत आहे. तरीही सर्व इमारतींची तपासणी करून महापालिका स्ट्रक्चरल आॅडिट करणार आहे व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नूतनीकरणाचा निर्णय घेणार आहे. तूर्तास तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पडण्यास आलेल्या भागाला आधार देण्यासाठी गोण्या लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्ष इमारतीची शास्त्रोक्तपद्धतीने डागुडुजी आणि नूतनीकरणाचे काम पावसाळ्यानंतरच करण्यात येईल, अशी माहिती शहर अभियंता संजय घुगे यांनी दिली.पूर्व कार्यालय पंडित कॉलनीत जाणारब्रिटिशकालीन इमारतीचा काही भाग धोकादायक असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पंडित कॉलनीतील जुन्या मनपा इमारतीतच पूर्व विभागाच्या कार्यालयाचे स्थलांतर करण्याचा विचार प्रशासन करीत आहेत. सध्या याठिकाणी पश्चिम विभागीय कार्यालयदेखील आहे. या इमारतीतील शिक्षण मंडळाचे कार्यालय राजीव गांधी भवनात स्थलांतरित झाल्याने त्या जागेत पूर्व विभागाचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव आहे. मुळात द्वारका येथे मनपाच्या जागेत पूर्व विभागासाठी नूतन इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. तो प्रलंबितअसल्याने सध्या मेनरोड येथील जुन्या इमारतीतूनच पूर्वविभागाचे कामकाज चालते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक