शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

सेनेचे संपर्कप्रमुखपद भाऊसाहेब चौधरींकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:26 IST

नाशिक : शिवसेनेच्या महानगरप्रमुख बदलाच्या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनी हे पद सोडताच त्यांच्या जागी भाऊसाहेब चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने त्यांचे नाव अधिकृतरीत्या घोषित करण्यात आले असून, त्याचबरोबर जिल्ह्यातील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचीदेखील घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्देफेरबदल : महिला आघाडीची नूतन कार्यकारिणी घोषितअजय चौधरी यांना धक्का देण्याचा पहिला प्रयत्न हस्तक्षेपाला कंटाळून त्यांनी नाशिकच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची विनंती

नाशिक : शिवसेनेच्या महानगरप्रमुख बदलाच्या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनी हे पद सोडताच त्यांच्या जागी भाऊसाहेब चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने त्यांचे नाव अधिकृतरीत्या घोषित करण्यात आले असून, त्याचबरोबर जिल्ह्यातील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचीदेखील घोषणा करण्यात आली आहे.शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून गटबाजी वाढीस लागत होती. त्याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवरूनदेखील फेरबदलांना सुरुवात झाली होती. महापालिका निवडणुकीत तर ही गटबाजी अधिक उफाळून आल्यानंतर राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, सेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याचवेळी पक्षातील बदलाची सूचक नांदी मानली जात होती. अलीकडेच पक्षाचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना हटवून त्यांच्या जागी दोन विधानसभा मतदारसंघासाठी सचिन मराठे आणि दोन मतदारसंघांसाठी महेश बडवे यांची नियुक्ती करण्यात आली. हा निर्णय घेताना संपर्कप्रमुख अजय चौधरी यांना पूर्णत: अंधारात ठेवण्यात आल्याची चर्चा होती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे नाराज झालेल्या चौधरी यांनी नाशिकमध्ये येऊन खडे बोल सुनावले होते. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या नेत्याकडे जाऊन नाशिकच्या संपर्क प्रमुखपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. ती मान्य करून शिवसेना अध्यक्षांनी त्यांच्या ऐवजी भाऊसाहेब चौधरी यांची नियुक्त केली. भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे सध्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी होती. त्यांच्याकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आल्याने आता संपूर्ण जिल्ह्णाची सूत्रे देण्यात आली आहे.याशिवाय गेल्या सात ते आठ महिन्यांपूर्वी बरखास्त करण्यात आलेल्या महिला कार्यकारिणीला यानिमित्त मुहूर्त लागला आहे. नाशिक महानगर प्रमुखपदी श्यामला दीक्षित या कायमच आहेत. उर्वरित कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. याशिवाय देवळाली विधानसभा, इगतपुरी विधानसभा आणि नाशिक ग्रामीण याप्रमाणे महिला आघाडी घोषित करण्यात आल्या आहेत. स्वीकृत नगरसेवक नियुक्तीत प्रयत्ननाशिकचे संपर्कप्रमुख म्हणून काम करताना अजय चौधरीयांना धक्का देण्याचा पहिला प्रयत्न स्वीकृत नगरसेवक नियुक्तीत झाला. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीसाठी अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांची दावेदारी, स्थायी समितीचे सदस्य नियुक्ती आणि आता महानगरप्रमुखाचा बदल अशाप्रकारे एकेक क्रमाने घटना घडल्याने याच हस्तक्षेपाला कंटाळून त्यांनी नाशिकच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची विनंती केल्याचे सांगण्यात येत आहे.