शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

किसान सभेच्या वतीने ‘जवाब दो’ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:09 IST

: जिल्ह्यातील शेतकºयांच्या १९९५-२००० सालापर्यंतच्या सहकारी उपसा जलसिंचन संस्था स्थापन करण्यात आल्या; मात्र यामध्ये शेतकºयांची फसवणूक झाली. या योजनेतून शेतीला थेंबभरही पाणी मिळू शकले नाही, उलट शेतकºयांच्या सातबारावर लाखो रुपयांचा बोजा लागल्याने शेतकºयांचा सातबारा कोरा करून कर्जमुक्ती करावी, या मागणीसाठी जिल्हा किसान सभेच्या वतीने ‘जवाब दो’ मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देसातबारा कोरा करून कर्जमुक्ती करावी,रणरणत्या उन्हात बळीराजा रस्त्यावर

नाशिक : जिल्ह्यातील शेतकºयांच्या १९९५-२००० सालापर्यंतच्या सहकारी उपसा जलसिंचन संस्था स्थापन करण्यात आल्या; मात्र यामध्ये शेतकºयांची फसवणूक झाली. या योजनेतून शेतीला थेंबभरही पाणी मिळू शकले नाही, उलट शेतकºयांच्या सातबारावर लाखो रुपयांचा बोजा लागल्याने शेतकºयांचा सातबारा कोरा करून कर्जमुक्ती करावी, या मागणीसाठी जिल्हा किसान सभेच्या वतीने ‘जवाब दो’ मोर्चा काढण्यात आला.  जिल्हा किसान सभा संचलित बंद उपसा जलसिंचन सहकारी संस्था बाधित शेतक री संघर्ष समितीच्या वतीने शेतकºयांना कर्जपुरवठाही बॅँकांकडून केला जात नाही. त्यामुळे सावकारांच्या कर्जावर शेतकरी शेती कसून देश पोसत आहे. २००८ व २०१७ च्या केंद्र व राज्य शासनाच्या कर्जमाफीपासून या बंद उपसा जलसिंचन संस्थेचे सभासद शेतकरी अद्याप वंचित असल्याचे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यातील बंद उपसा तापी खोºयातील संस्थांना एकनाथ खडसे व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न करून कर्जमुक्ती दिली; मात्र नाशिक जिल्हा अद्याप वंचित राहिला हे दुर्दैवच, असे म्हटले आहे. बागायती जिल्ह्यातील शेतकरीदेखील कर्जबाजारीमुळे गळफास लावत आहेत; मात्र सरकारला याबाबत कुठलेही गांभीर्य नसल्याने किसान सभेने ‘जवाब दो’ मोर्चाद्वारे संताप व्यक्त केला. सहकारी संस्थांचे सभासद असलेल्या शेतकºयांनी शेती विकून कर्ज भरले असून, जिल्हा बॅँकेकडून करण्यात आलेल्या कर्जपुरवठ्यात मुद्दलापेक्षा अधिक रक्कमही जमा केली आहे; मात्र अद्याप शेतकºयांच्या सातबारावर लाखो रुपयांचा बोजा कायम असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकू ण आठ संस्था असून, त्या त्वरित कर्जमुक्त कराव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर भास्कर शिंदे, संपत थेटे, मधुकर कसबे, निवृत्ती कसबे, भीमा उगले आदींच्या स्वाक्षºया आहेत.रणरणत्या उन्हात बळीराजा रस्त्यावरसोमवारी शहराचे तपमान ३३ अंशाच्या पुढे सरकले असताना, रणरणत्या उन्हात प्रकल्पबाधित बळीराजा बी. डी. भालेकर मैदानावर एकत्र आला. एकजूट होऊन शेतकºयांनी शासनाकडे ‘जवाब दो’चा एल्गार लगावत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात जिल्ह्यातील सिन्नर, नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, नांदगाव, मालेगाव, येवला या तालुक्यांमधील शेतकरी सहभागी झाले होते. तसेच बंद उपसा जलसिंचन सहकारी संस्था बाधित शेतकरी संघर्ष समितीचे क ार्यकर्तेही सामील झाले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी