ग्रामीण महिलांच्या प्रशिक्षणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:38 AM2020-02-15T00:38:57+5:302020-02-15T00:40:14+5:30

महिलांच्या सक्षमीकरणाचा भाग म्हणून राज्य शासन अनेक योजना राबवित असताना जिल्हा परिषदेच्या राखीव निधीतून महिला व बाल कल्याण विभागाने ‘सशक्त नारी, सशक्त समाज’ अशा धर्तीवर जिल्ह्यातील ग्रामीण महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ‘ब्यूटिपार्लर प्रशिक्षण’ देण्यास सुरुवात केली आहे. नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला.

Begin training of rural women | ग्रामीण महिलांच्या प्रशिक्षणास प्रारंभ

ग्रामीण महिलांच्या प्रशिक्षणास प्रारंभ

Next

नाशिक : महिलांच्या सक्षमीकरणाचा भाग म्हणून राज्य शासन अनेक योजना राबवित असताना जिल्हा परिषदेच्या राखीव निधीतून महिला व बाल कल्याण विभागाने ‘सशक्त नारी, सशक्त समाज’ अशा धर्तीवर जिल्ह्यातील ग्रामीण महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ‘ब्यूटिपार्लर प्रशिक्षण’ देण्यास सुरुवात केली आहे. नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेगवेगळ्या मार्गाने त्यांना मदत करत असते. महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्या जोमाने विकासकामांत सहभागी व्हाव्यात यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे.
महिला सशक्त झाल्या तर समाज सशक्त होईल, अशा उद्देशाने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत १० टक्के राखीव निधीतून महिलांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे
सांगितले. त्याचप्रमाणे विशेष घटनेयोजने अंतर्गत प्रत्येक महिला व मुलींनाही सक्षम करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबविले जात असून, त्यात सक्रिय सहभाग नोंदवित आहेत.



याचा आर्थिक स्तर उंचावण्याकामी उपयोग करावा, असे आवाहनही आहेर यांनी केले. याप्रसंगी न्यायडोंगरी गटातील अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्याशी कुपोषण निर्मूलन तसेच अंगणवाडी बांधकाम व इतर विषयांबाबत चर्चा करण्यात आली.

Web Title: Begin training of rural women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.