शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

जिल्ह्यातील पाण्याचा स्रोत तपासण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 01:01 IST

नाशिक : ग्रामीण भागातील जनतेचे दूषित पाण्यापासून होणाऱ्या आरोग्याचा धोका टाळण्याबरोबरच त्यांचे आरोग्यमान उंचावण्याच्या दृष्टीने यावर्षीही आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील जलस्रोतांची मोबाइल अ‍ॅपद्वारे रासायनिक जैविक तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. १ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या या अभियानात महिनाभरात ७,३९३ स्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे७,३९३ नमुने घेणार : । ग्रामपंचायतींवर जबाबदारी निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ग्रामीण भागातील जनतेचे दूषित पाण्यापासून होणाऱ्या आरोग्याचा धोका टाळण्याबरोबरच त्यांचे आरोग्यमान उंचावण्याच्या दृष्टीने यावर्षीही आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील जलस्रोतांची मोबाइल अ‍ॅपद्वारे रासायनिक जैविक तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. १ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या या अभियानात महिनाभरात ७,३९३ स्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात येणार आहेत.नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने ‘जिल्हा पाणी स्वच्छता मिशन’ हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्यात शुद्ध व निर्जंतुक पाणी ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर स्वच्छता सर्वेक्षण अभियान राबविले जाते. सध्या जिल्ह्णात सुमारे ७,३९३ जलस्रोत असून, या सर्व स्रोतांची तपासणी याद्वारे होणार आहे. यासाठी सर्व तालुक्यांना सूचना देण्यात आल्या असून, अनेक तालुक्यांमध्ये या कामास सुरुवातही झाली आहे. रासायनिक पाणी नमुने तपासणी अभियानाचे काम जिल्ह्यात शंभर टक्के पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानुसार हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा व तालुका कक्षाचे तज्ज्ञ सल्लागार यांच्या मदतीने कक्षाच्या पाणी व गुणवत्ता सल्लागार या अभियानाचे सनियंत्रण करत असून, या अभियानात जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सहायक यांच्या सहकार्याने जिओ फेन्सिंग मोबाइल अ‍ॅपद्वारे गोळा करावयाचे आहेत. गोळा करण्यात आलेल्या पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणांच्या उपविभागीय प्रयोगशाळांतून करण्यात येणार आहे.सदर अभियानात विहित नमुने आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले असून, त्याद्वारे पाण्याचा स्त्रोतांचा परिसर, योजनेमधील गळती, पाणी शुद्धीकरण याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून आलेल्या जोखमीप्रमाणे ग्रामपंचायतीस पाणी गुणवत्तेविषयी जोखीम निश्चित करण्यात येणार आहे. त्याआधारे ग्रामपंचायतीस लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात येणार आहे. याबाबत शनिवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी आरोग्य विभागातील तालुकास्तरीय यंत्रणेची बैठक घेऊन शासन निकषाप्रमाणेस्वच्छता सर्वेक्षण करण्याचे व तालुकास्तरावरून त्याची फेरपडताळणी करण्याची निर्देश दिले.अशी होणार तपासणीसार्वजनिक पिण्याच्या स्रोतांचे सॅटेलाइटद्वारे टॅग करण्यासाठी शासनाने नागपूर येथील संस्थेला जबाबदारी दिली आहे. जिओफेन्सिंग हे एक मोबाइल अ‍ॅप असून, हे अ‍ॅप सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने गोळा करण्यासाठी वापरतात. स्रोतांच्या दहा मीटर परिघात गेल्यावर अ‍ॅप सुरू करून त्याद्वारे स्रोत जिओ टॅग करण्यात येऊन फोटो घेऊन नमुना घेण्यात येतो. याद्वारे जिल्ह्यात किती पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी झाली, किती पिण्याच्या पाण्याचे स्रोत रासायनिक तपासणीसाठी शिल्लक राहिले याची माहिती मिळते.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक