शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण करणे भोवले; पोलिसांकडून तीघांना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 13:53 IST

पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या घटनेनंतर स्वत: जाऊन पेट्रोलपंपाला भेट दिली. पंपचालकासह ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्याच्याशी संवाद साधला. यावेळी संशयितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देपाण्डेय तत्काळ पंपावर हजरपंपावर अधिक पोलीस बंदोबस्त पुरविण्याच्या सुचना

नाशिक : रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचा होणारा मृत्यु टाळण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशानुसार शहरात स्वातंत्र्यदिनापासून शहरात ह्यनो हेल्मेट नो पेट्रोलह्ण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत पेट्रोल भरताना हेल्मेट अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, दिंडोरी रोडवरील इच्छामणी पेट्रोल पंपावर या नियमाची अंमलबजावणी करणाऱ्या पेट्रोलपंप कर्मचाऱ्याला हेल्मेट नसलेल्या चौघा दुचाकीस्वारांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन मारहाण करणाऱ्या संशयितांची ओळख पटवून तीघांना अटक केली आहे.

पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांनी गंभीरपणे दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.सोशलमिडियावरुन सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत संशयितांची ओळख पटवून संशयित मंगेश भास्कर पगारे (२६), मयुर त्र्यंबक देवकर (२५, दोघे रा.स्नेहनगर, म्हसरुळ) आणि अक्षय अविनाश जाधव (२६,रा.पेठरोड) या तीघांना बेड्या ठोकल्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सांगितले.बंदोबस्तावरील पोलीस गायबपेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांना 'नो हेल्मेट नो पेट्रोल' या उपक्रमांतर्गत  हेल्मेट अनिवार्य केले आहे. विना हेल्मेट पेट्रोल दिले जाते की नाही याबाबत कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांची पंपांवर बंदोस्तासाठी नियुक्तीचे आदेश दिले आहेत. म्हसरूळ शिवारातील ज्या पेट्रोल पंपावर मारहाणीची घटना घडली त्याठिकाणी पोलीस कर्मचारी त्यावेळी बंदोबस्तावर हजर नव्हते. जर पोलीस असते तर संशयितांनी कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचे धाडस दाखविले नसते अशी चर्चा सुरु आहे.पाण्डेय तत्काळ पंपावर हजरपोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या घटनेनंतर स्वत: जाऊन पेट्रोलपंपाला भेट दिली. पंपचालकासह ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्याच्याशी संवाद साधला. यावेळी संशयितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच गुन्हे शोधपथकाला तत्काळ आदेशित करत मारहाण करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यास पाण्डेय यांनी सांगितले. पंपावर अधिक पोलीस बंदोबस्त पुरविण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधित पोलीस ठाण्याला केल्या आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकTrafficवाहतूक कोंडीPetrolपेट्रोलPolice Stationपोलीस ठाणे