शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

संवादातून उलगडली ‘आॅफ बीट भटकंती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:04 IST

अलीकडच्या काळात पर्यटन लोकप्रिय होत चाललंय, ही आनंदाची बाब असली तरीही चाकोरीबद्ध पर्यटन करणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि रसिक पर्यटक जयप्रकाश प्रधान यांनी ‘आॅफ बीट भटकंती आणि बातमी मागची बातमी’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.

नाशिक : अलीकडच्या काळात पर्यटन लोकप्रिय होत चाललंय, ही आनंदाची बाब असली तरीही चाकोरीबद्ध पर्यटन करणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि रसिक पर्यटक जयप्रकाश प्रधान यांनी ‘आॅफ बीट भटकंती आणि बातमी मागची बातमी’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.ज्योती स्टोअर्स आणि शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग यांच्यातर्फे गंगापूररोड येथील कूर्तकोटी सभागृहात आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमातील द्वितीय पुष्प गुंफतांना जयप्रकाश प्रधान यांनी पर्यटन क्षेत्रातील विविध स्थळांबाबत माहिती तसेच पर्यटन करताना आलेले अनुभव यावेळी प्रेक्षकांसमोर सादर केले. यावेळी उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधताना प्रधान यांनी ७५ देशांची भटकंती पूर्ण केली असून, महाराष्ट्रातील प्रत्येकाने महाराष्ट्र दर्शन करणे आवश्यक असून, केवळ मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांना भेटी देण्याऐवजी राज्याचा ग्रामीण भाग, कोकण, गडचिरोली, चंद्रपूर अशा भागांतही आवर्जून जायला हवे, असे आवाहन केले. यावेळी प्रधान यांनी हॉलंड, युरोप, स्विडन या देशांसह माल्टा बेट, आर्किक्ट सर्कल आदी परिसराचीदेखील माहिती देताना तेथील निवडक छायाचित्र स्लाइड शो द्वारे दाखविली. यावेळी माल्टा बेटाबद्दल सांगताना या बेटावरील निसर्गसौंदर्य, तेथील आल्हाददायक वातावरण तसेच याठिकाणी भारतीय खाद्यपदार्थांची हॉटेल्स असल्याचेही प्रधान यांनी आवर्जून सांगितले. आर्टिक्ट सर्कल येथील नैसर्गिक चमत्कार प्रत्येकाने अनुभवायला हवेत हे सांगताना येथील २४ तासांचा दिवस आणि २४ तासांची रात्र तसेच नॉर्दन लाइट्स या सूर्यावर होणाºया स्फोटकांमुळे आकाशात तयार होणाºया प्रकाश लहरी याबाबतही प्रधान यांनी माहिती दिली. ‘आॅफ बीट भटकंती’ यासह ‘बातमी मागची बातमी’ या विषयावर बोलताना प्रधान यांनी पत्रकारिता करताना आलेले विविध अनुभव तसेच राजकीय, आर्थिक, गुन्हेगारी विभागात पत्रकारिता करताना प्रसिद्ध झालेल्या विविध बातम्यांचीही माहिती यावेळी दिली. या व्याख्यानाप्रसंगी नाशिक महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, ज्येष्ठ पर्यटक विजय आव्हाड, शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी उपस्थित होते.