शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

‘बीट मार्शल’ला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:23 IST

वडाळागाव परिसरात सराईत गुन्हेगारांची वाढती संख्या आणि त्यांच्याकडून कायदासुव्यवस्थेला लावला जाणारा गालबोट दिवसेंदिवस वाढत चालल्याने सर्वसामान्यांसह पोलिसांनाही त्याचा फटका बसू लागला आहे हे विशेष! मद्यप्राशन करून मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर शेकोटी पेटवून बसलेल्या सराईत गुन्हेगाराला हटकले म्हणून त्याने थेट ‘बीट मार्शल’वरच चाल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देसराईत गुन्हेगाराची मजल : सर्वसामान्यांसह पोलिसांनाही गुंडांचा त्रास

इंदिरानगर : वडाळागाव परिसरात सराईत गुन्हेगारांची वाढती संख्या आणि त्यांच्याकडून कायदासुव्यवस्थेला लावला जाणारा गालबोट दिवसेंदिवस वाढत चालल्याने सर्वसामान्यांसह पोलिसांनाही त्याचा फटका बसू लागला आहे हे विशेष! मद्यप्राशन करून मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर शेकोटी पेटवून बसलेल्या सराईत गुन्हेगाराला हटकले म्हणून त्याने थेट ‘बीट मार्शल’वरच चाल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, महापालिकेच्या घरकुल प्रकल्पाच्या इमारतींजवळ शंभरफुटी रस्त्यालगत शेकोटी पेटवून बसलेला सराईत गुन्हेगार फारुख सुभान शहा हा टोळक्यासह बसलेला बीट मार्शल संतोष जुंद्रे यांना आढळला. शहा सराईत गुन्हेगार असल्याचे लक्षात येताच जुंद्रे यांनी तत्काळ त्याला उठवून हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी शहा याने जुंद्रे यांची वर्दी धरू न धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यास सुरुवात करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. जुंद्रे यांचे सहकारी पोलीस नाईक कनोजे यांच्याशी झटापट करण्यास सुरुवात केली. जुंद्रे यांना ढकलल्याने ते जमिनीवर पडल्याने जखमी झाले. तसेच फारुखदेखील बेधुंद अवस्थेत असल्यामुळे तोदेखील खाली पडला अन् त्याला मार लागला.कनोजे यांनी तत्काळ बिनतारी संदेश यंत्रावरून इंदिरानगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधत वाढीव बळाची मदत मागितली. मदत येताच पोलिसांनी दोघांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. जुंद्रे यांनीदिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगार शहाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘खाकी’चा धाकच राहिला नाहीइंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी बघता ‘खाकी’चा धाकच राहिला नसल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. चार दिवसांपूर्वी जबरी लूट करून व्यावसायिकाचा झालेला खून आणि त्यानंतर अशाप्रकारे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाºयावर सराईत गुन्हेगाराकडून झालेला हल्ला या दोन्ही घटना गुन्हेगारांची मजल कुठपर्यंत पोहचली आहे व त्यांना खाकीचा धाक कितपत राहिला आहे, हे अधोरेखित करणाºया ठरतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी