या वेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी पुष्पावती पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, कार्यभारानुसार कला व क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. प्रयोगशाळा साहाय्यक व ग्रंथपाल पदासाठी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी, संस्थेत वाद असलेल्या ठिकाणी किंवा संस्था मुख्याध्यापक नियुक्तीस टाळाटाळ करीत असल्यास सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक नियुक्त करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी यांना देण्यात यावा, अशा संस्थांवर प्रशासक नियुक्त करण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली. या वेळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, नानासाहेब बोरस्ते, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष टी.एम. डोंगरे, कार्यवाह चंद्रकांत कुशारे, कार्याध्यक्ष प्रदीप सांगळे, शहराध्यक्ष मोहन चकोर, कार्यवाहक बी.के. सानप, ई.के. कांगणे, रवींद्र मोरे, एस. बी. शिरसाट, एस. के. टिळे, बाळासाहेब ढोबळे, भाऊसाहेब शिरसाट, अरुण पवार, रामराव बनकर, संजय गीते, एम.टी. घोडके, अरविंद जोशी, जे.एस. पवार, जे.सी. खताळ, आर.एच. नागरे आदी उपस्थित होते. (फोटो २४ शिक्षक)
माध्यमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST