शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआय नियमांमुळे रणजी स्पर्धेचे काटेकोर नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:45 IST

खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे यंदा रणजी स्पर्धेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंना भेटणे आणि त्यांच्याबरोबर सेल्फी घेणे काहीसे कठीण झाले आहे.

खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे यंदा रणजी स्पर्धेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंना भेटणे आणि त्यांच्याबरोबर सेल्फी घेणे काहीसे कठीण झाले आहे. या रणजी सामन्यात भारतीय संघाचा खेळाडू केदार जाधव असल्याने बीसीसीआयचे विशेष लक्ष असणार आहे. खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या नियमांमुळे यंदा खेळाडूंभोवती बीसीसीआयचे कडे करण्यात आले आहे. खेळाडूंचे पॅव्हेलियन आणि खेळाडूंवर बारकाईने वैयक्तिक लक्ष ठेवले जात आहे. यासाठी बीसीसीआय लाचलुचपत विभागाचे निरीक्षक सामन्याच्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत.खेळाडूंना कोणत्याही कार्यक्रमाला जाण्याची परवानगी नसून कोणाबरोबर संवाददेखील ते साधू शकत नाहीत. यासाठी अगोदर त्यांच्या मॅनेजरची परवानी घ्यावी लागू शकते. सदर आचारसंहिता स्टार खेळाडूंबाबत असून, रणजीतील इतर खेळाडूंना मात्र काहीसा दिलासा मिळालेला आहे.  पॅव्हेलियन परिसर निषिद्ध क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही संघाच्या पॅव्हेलियनच्या पॅसेजमध्ये आॅफिशिअल्स वगळता त्रयस्त कुणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. लॉबी समोरून जाण्या-येण्यासही मज्जाव करण्यात आलेला आहे. त्याचे काटेकोर पालनही केले जाणार असून, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकारी आणि पाहुण्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था लॉबीपासून दूर करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत भारताकडून खेळणारे केदार जाधव आणि सौराष्टÑकडून जयदीप उनाडकट हे खेळत असल्याने सुरक्षा यंत्रणेला चांगलीच धावपळ करावी लागण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या नियमाप्रमाणे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने सामन्याची काटेकोर तयारी केली आहे.खेळाडूंना मोबाइल ‘नॉट अलाउड’बीसीसीआयच्या नियमाप्रमाणे दोन्ही संघांच्या खेळाडूंना मोबाइल वापरण्यावर मर्यादा आली आहे. त्यामुळे त्यांना सामन्याच्या दरम्यान आपले मोबाइल संघ व्यवस्थापकाकडे जमा करावे लागणार आहेत. स्पर्धा सुरू असताना त्यांचा त्रयस्थांशी संपर्क येऊ नये म्हणून बीसीसीआयने काळजी घेतली आहे. खेळाडूंना कोणत्याही उद्घाटनासाठी किंवा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहता येणार नाही.

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीRanji Trophyरणजी करंडकNashikनाशिक