शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

खाडी झाली भंगारमुक्त; डेब्रीज खतप्रकल्पावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:31 IST

अंबड लिंकरोडवरील बहुचर्चित खाडी परिसरात शुक्रवारी महापालिकेमार्फत भंगार बाजार हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. दिवसभरात १३० ट्रक माल उचलण्यात येऊन तो सातपूर क्लब हाउस येथे नेण्यात आला, तर सुमारे ४१ ट्रक भरून डेब्रीज, कचरा व टाकाऊ साहित्य खतप्रकल्पावर डम्पिंगसाठी रवाना करण्यात आले. दुसºया दिवशीही काही व्यावसायिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला.

सिडको/सातपूर : अंबड लिंकरोडवरील बहुचर्चित खाडी परिसरात शुक्रवारी महापालिकेमार्फत भंगार बाजार हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. दिवसभरात १३० ट्रक माल उचलण्यात येऊन तो सातपूर क्लब हाउस येथे नेण्यात आला, तर सुमारे ४१ ट्रक भरून डेब्रीज, कचरा व टाकाऊ साहित्य खतप्रकल्पावर डम्पिंगसाठी रवाना करण्यात आले. दुसºया दिवशीही काही व्यावसायिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, महापालिकेने कोणालाही न जुमानता आपली मोहीम फत्ते केली. शनिवारीही (दि.१४) सदर मोहीम राबविली जाणार आहे.  महापालिका व पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्तरीत्या भंगार बाजार हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेच्या दुसºया दिवशी सकाळी ९ वाजता पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या सहाही पथकांनी बहुचर्चित खाडी परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. त्यात काही भंगार व्यावसायिकांनी उभारलेले पत्र्यांचे शेड तसेच पक्की बांधकामे उद्ध्वस्त करण्यात आली. ज्या व्यावसायिकांनी स्वत:हून भंगार काढण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्यांना त्यासाठी संधी देण्यात आली. शुक्रवारीही काही व्यावसायिकांनी कागदपत्रे दाखवून कारवाई थांबविण्याची विनंती केली. परंतु, पथकाने कोणालाही न जुमानता आपली कारवाई सुरूच ठेवली. एकीकडे महापालिकेची कारवाई सुरू असताना काही व्यावसायिकांकडून मात्र स्वत:हून माल उचलण्याची धावपळ सुरू होती. महापालिकेने दिवसभरात १३० ट्रक माल जप्त करत तो सातपूर क्लब हाउसवरील जागेत नेला, तर सुमारे ४१ ट्रकभर डेब्रीज, टाकावू साहित्य व कचरा खतप्रकल्पावर नेण्यात आला. खतप्रकल्प ते भंगार बाजार यादरम्यान वाहतुकीला वेळ लागत असल्याने माल उचलण्यातही विलंब लागत होता. शुक्रवारी मोहिमेप्रसंगी सुमारे ४५० पोलीस, मनपाचे सुमारे ३५० कर्मचारी तसेच ६ क्रेन, २१ जेसीबी, ३० डम्पर व ३२ ट्रक-ट्रॅक्टर तैनात होते. शनिवारी (दि.१४) सदर मोहीम पुढे सुरूच राहणार असून, माल वाहतुकीसाठी १२ डम्पर आणखी वाढविण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली. दरम्यान, दिवसभर एकूणच मोहिमेवर अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे व रमेश पवार तसेच अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम स्वत: ठाण मांडत लक्ष ठेवून होते. शुक्रवारी खाडीभागासह संजीवनगर ते रामकृष्णनगर परिसरातील बरेचसे भंगार साहित्य उचलण्यात आले आहे.शेड वाचविण्यासाठी महिलांचा आधारमहापालिकेने अनधिकृत शेड हटविण्यास सुरुवात केल्यानंतर काही ठिकाणी व्यावसायिकांनी महिलांसह कुटुंबीयांना आणून बसविले होते. सदर शेडमध्ये रहिवासी राहत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. महापालिकेच्या पथकाने तूर्त जेथे रहिवासी आहेत तेथे कारवाई न करण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, मोहीम संपण्यापूर्वी शेडमध्ये खरोखरच रहिवासी राहतात काय याची खातरजमा करून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.स्थगिती आदेशाला केराची टोपलीएका व्यावसायिकाने कारवाईस विरोध दर्शविला आणि कोर्टाकडून स्थगिती आदेश येत असल्याचे सांगत तोपर्यंत कारवाई करू नये, अशी भूमिका घेतली. परंतु, पथकाने त्याचे काहीही न ऐकता कारवाई सुरू केली व पक्के बांधकाम तोडून टाकले. काही वेळानंतर सदर व्यावसायिकाने स्थगिती आदेश आल्याचे सांगितले. परंतु, तोपर्यंत महापालिकेने आपले काम फत्ते केले होते. एका व्यावसायिकाने मोठ्या प्रमाणावर लाकडी फळ्यांचा साठा करून ठेवलेला होता. सदर साठा उचलण्यासाठी सुमारे १५ ट्रक लागले.