शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

तातडीच्या अहवालांसाठी ट्रुनॅट मशीनचा आधार ;  दिवसभरात किमान १२ नमुन्यांची होते चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:48 IST

आयसीएमआरकडून चाचण्या घेण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आल्यामुळे ट्रु नॅट मशीनवर नुमन्यांच्या तपासणीस प्रारंभ करण्यात आला. महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये आणि मालेगाव महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या ट्रु नॅट मशीनच्या कामकाजाला सुरळीतपणे प्रारंभ झाला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या तातडीच्या नमुन्यांची प्राथमिक चाचणी ट्रु नॅट मशीनद्वारे ट्रु नॅट मशीनच्या कामकाजाला सुरळीतपणे प्रारंभझाकीर हुसैन हॉस्पिटल आणि मालेगाव महापालिकेच्या रुग्णालयात वापर

नाशिक :  महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये आणि मालेगाव महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या ट्रु नॅट मशीनच्या कामकाजाला सुरळीतपणे प्रारंभ झाला आहे. या दोन्ही मशीनवर कोरोनाच्या तातडीच्या नमुन्यांची प्राथमिक चाचणी करण्यात येत असल्याने जिल्ह्यातील इमर्जन्सी केसेसबाबत अहवाल स्थानिक स्तरावरच आणि त्याच दिवशी मिळणे शक्य झाले आहे. आयसीएमआर या राष्ट्रीय संस्थेकडून चाचण्या घेण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आल्यामुळे ट्रु नॅट मशीनवर नुमन्यांच्या तपासणीस प्रारंभ करण्यात आला. क्षयरोग विभागाकडून या दोन मशीन्सना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरकडे सुपूर्द करण्यात येणार होते. परंतु, नागपूरपेक्षा नाशिक शहर आणि जिल्ह्याची स्थिती अधिक बिकट असल्याचे यंत्रणेच्या लक्षात आले. त्यामुळे नाशिक आणि मालेगाव शहराच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून हे ट्रुनॅट मशीन नाशिकच्या दोन रुग्णालयांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या मशीनवरील चाचण्यांची नोंददेखील आयसीएमआरच्या साइटवर केली जात आहे. त्यापूर्वी आयसीएमआरकडून या तपासणीच्या नोंदी त्यांच्या साइटला जोडून त्यासंदर्भात ग्रीन सिग्नल मिळेपर्यंत चाचण्या सुरू करण्यात आल्या नव्हत्या. सद्यस्थितीत नाशिक शहरातील बाधितांच्या किंवा अन्य उपचारांसाठीदेखील दाखल होणाºया कोविड संशयितांच्या नमुन्यांची तपासणी पुण्याच्या प्रयोगशाळेत, तर मालेगावच्या संशयितांची तपासणी धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड तपासणी केंद्रात केली जाते. मात्र, तातडीचे किंवा वैद्यकीय कारणास्तव काही अग्रक्रमाचे अहवाल असल्यास त्यांची तपासणी या मशीनवरच केली जात आहे. टीबीचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या गेलेल्या सीबीनॅट आणि ट्रुनॅट मशीनमध्ये काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. कोविड तपासणीसाठी त्यात वेगळे सॉफ्टवेअर आणि चीप बसविण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीच्या डीएनएनचे अ‍ॅम्प्लिफिकेशन करून तो विषाणू आहे की नाही ते मशीन शोधून त्याबाबतचा अहवाल संगणकावर देते.  दरम्यान, ट्रुनॅट मशीन हे एकाचवेळी दोन रुग्णांच्या थुंकीच्या नमुन्यांची चाचणी करता येते. साधारणपणे दोन तासांत दोन्ही चाचणीचा अहवाल मिळू शकतो. दाट संशयित, गर्भवती महिला, संशयित मृत किंवा एखादा अन्य आजारांने बाधित मात्र त्या उपचारापूर्वी कोरोना निगेटिव्ह टेस्ट मिळणे अपेक्षित असलेल्या रुग्णांची मोठी सोय झाली आहे. त्यामुळे आता दिवसभराच्या कामकाजाच्या वेळेत डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात १२ चाचण्या तपासणी केंद्रात होत असल्याची माहिती झाकीर हुसैन हॉस्पिटलच्या डॉ. कल्पना कुटे यांनी दिली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकhospitalहॉस्पिटल