शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

तळघर बनले डासांचे आगर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:24 IST

नाशिक : शहरात पावसाळ्यामुळे आता रोगराईला सुरुवात झाली असून, डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र, शहराच्या अनेक भागांत इमारतींच्या तळघरांमध्येच पावसाचे पाणी साचल्याने डेंग्यू डासांची निर्मिती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तळघर की डासांचे आगर? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देरोगराईला निमंत्रण : महानगरपालिका क्षेत्रातील बहुतांश व्यापारी संकुलांकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरात पावसाळ्यामुळे आता रोगराईला सुरुवात झाली असून, डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहेत. मात्र, शहराच्या अनेक भागांत इमारतींच्या तळघरांमध्येच पावसाचे पाणी साचल्याने डेंग्यू डासांची निर्मिती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तळघर की डासांचे आगर? असा प्रश्न निर्माण झाला आहे.दरवर्षी पावसाळ्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा हंगाम सुरू होतो. गेल्या काही वर्षांत डेंग्यूमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. गेल्यावर्षी शहरात तीन हजारांहून अधिक संशयित डेंग्यू रुग्ण आढळले होते. त्यापैकी एक हजार नागरिकांना डेंग्यू झाल्याचे आढळले होते. यंदा कोरोनामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा व्यस्त असताना दुसरीकडे नागरिकांचेदेखील पावसाळ्यात आरोग्य विषयक दक्षता घेण्याकडे दुर्लक्ष होत आहे. शहराच्या अनेक भागांत व्यापारी संकुले व अन्य रहिवासी इमारतींच्या तळघरात पाणी साचत असून, त्यात डेंग्यू डासांची निर्मिती होत आहे. पावसाळ्यात इमारतीच्या छतावर, तळघरात किंवा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचून त्यात डेंग्यू डासांची निर्मिती होते. महापालिकेच्या सर्वेक्षणात असे अनेकदा आढळलं आहे. त्यानुसार संबंधित भागात डेंग्यू रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वतीने इमारतमालकांना अथवा विकासकांना नोटिसा बजावल्या जातात, परंतु त्यापलीकडे कोणतीही कारवाई होत नसल्याने दरवर्षीच असा प्रश्न निर्माण होत असतो. सध्या कोरोनाचे संकट असताना आता पावसाळ्यामुळे या आजारांनी डोके वर काढले आहे.जुलै महिन्यात शहरात ३२ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने वेळीच उपाययोजना करून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.अनास्था : कचऱ्यांच्या ढिगांकडे सोयीस्कर डोळेझाकमहात्मा गांधीरोडवरील व्यापारी संकुले म्हणजेच स्टेडियम कॉम्प्लेक्स येथे नेहमीप्रमाणे तळघरात पाणी साचले असून, डासांची निर्मिती होत आहे, मात्र याकडे महापालिका आणि संबंधित व्यापारी संकुलातील व्यावसायिकांचे दुर्लक्ष होत आहे. महानगरातील अनेक निवासी संकुले, शॉपिंग कॉम्प्लेक्समधील ग्राऊंड फ्लोअर आणि तळघरांमध्ये घाण आणि कचºयाचा प्रश्न वाढलेला आहे. त्याचा त्रास प्रामुख्याने आसपासच्या रहिवाशांना होत असून त्यांना कुणीच वाली नाही, अशी अवस्था आहे. केवळ याच नव्हे तर शहरातील अन्य भागांतदेखील डासनिर्मितीची अनेक ठिकाणे आणि ब्लॅकस्पॉट असून, त्याकडे लक्ष पुरवण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊस