नाशिकरोड : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त परिसरात ठिकठिकाणी प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.अनुराधा चौकात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन शंकरशेठ औशिकर, नगरसेविका सरोज आहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी यशवंत भाबड, निवृत्ती बोडके, जगन गवळी, पी. एम. दंदणे, पांडुरंग गुरव, आनंद जंगम, सुरेश धोंगडे, नंदू गवळी, किरण औशिकर, रवि औशिकर, नाना निस्ताणे, बाळासाहेब पाटील, प्रकाश देशमुख, सूर्यभान गोसावी, मालुंजकर, निखिल औशिकर, किरण लासुरे, विजय महानुभाव, दिनेश भदाणे, ए. पी. भालेराव आदि उपस्थित होते. मनपा विभागीय कार्यालयात नगरसेवक सूर्यकांत लवटे, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी बाळकृष्ण दंदणे, नंदकिशोर नगरकर, अनंत दंदणे, संदीप झारेकर, हेमंत गादगे, स्वप्नील झारेकर, रवि लोहारकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नाशिकरोडला बसवेश्वर जयंती
By admin | Updated: April 29, 2017 02:13 IST