शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बॅनर्स, फ्लेक्स व्यावसायिकांच्या धंद्यावर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 01:23 IST

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांवर असून, त्यावर देखरेख ठेवण्याचे काम प्रशासनाचे असले तरी, या आचारसंहितेच्या आड थेट व्यावसायिकांना त्यांचा व्यवसायच बंद करण्याच्या अटी, शर्ती पोलीस व महापालिकेने लादल्या आहेत.

ठळक मुद्देफौजदारीचा इशारा ,आचारसंहितेचा बाऊ परवानगीशिवाय छपाई न करण्याचे आदेश

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांवर असून, त्यावर देखरेख ठेवण्याचे काम प्रशासनाचे असले तरी, या आचारसंहितेच्या आड थेट व्यावसायिकांना त्यांचा व्यवसायच बंद करण्याच्या अटी, शर्तीपोलीस व महापालिकेने लादल्या आहेत.राजकीय बॅनर्स, फ्लेक्स आदी प्रचार साहित्य तयार करण्यापूर्वी संबंधितांकडून विविध परवानग्यांची खात्री करावी व मगच त्याची छपाई करावी, अशा सूचना देणाऱ्या नोटिसा व्यावसायिकांना पाठविण्यात आल्या असून, नियमांचा भंग झाल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.नाशिक शहरात सुमारे शंभराहून अधिक फ्लेक्स, बॅनर्स, बोर्ड बनविणारे व्यावसायिक असून राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने आयोजकांकडून येणाऱ्या मागणीनुसार ते तयार करून देण्याचे काम केले जाते. त्यातून सण, उत्सव, मिरवणूक या बाबींचाही समावेश आहे.तथापि, आता लोकसभेची आचासंहिता जारी करण्यात आल्याने शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे फलक, बॅनर्स, झेंडे महापालिकेच्या वतीने काढण्यात येत असून, अजूनही ज्या ठिकाणी अशा पद्धतीने फलक दिसत असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच तेदेखील तातडीने काढण्याची कार्यवाही सुरू आहे. महापालिकेच्या या कारवाईविषयी कोणाची तक्रार नसली तरी, आता मात्र यंत्रणेने राजकीय पक्ष व संघटनांपेक्षा थेट बॅनर, फ्लेक्स, बोर्ड तयार करणाºया व्यावसायिकांनाच आरोपीच्या पिंजºयात उभे केले आहे. ज्या कोणाचे बॅनर्स, पोस्टर्स तयार केले जातील ते तयार करण्यापूर्वी ते कोठे लावले जाईल याची परवानगी असेल तरच ते तयार केले जावे, तसेच महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणांवरच बॅनर्स लावावेत अन्यत्र कोठे बॅनर्स, पोस्टर्स लावले तर थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशा नोटिसा बजावल्या आहेत.१५० अधिकृत जागाशहरात महापालिकेच्या १५० अधिकृत जागा असून, या जागांवर अगोदरच क्लासेस, व्यावसायिकांनी पूर्वपरवानगीने बॅनर्स लावलेले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या काळात या जागा राजकीय पक्षांना मिळतीलच, असे नाही. शिवाय बॅनर्स, पोस्टर्स छपाई करण्यासाठी कोणी व कोणाची परवानगी आणायची याचा स्पष्ट उल्लेख व्यावसायिकांना बजावलेल्या नोटिसांमध्ये करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलीस व महापालिकेने एकत्र बजावलेल्या या नोटिसीची अर्थ काढणेही मुश्किल झाले असून, नाशिकरोडला तर एका पोलीस अधिकाºयाने थेट व्यावसायिकांना आता दुसरा व्यवसाय शोधायला सुरुवात करा, असा सल्ला देत गाठ माझ्याशी असल्याची धमकी दिली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliceपोलिस