शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक काळात बॅँकांनी व्यवहारांची माहिती सादर करावी - जिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 05:56 IST

निवडणूक काळात बँकांनी बँकेत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील ठेवणे आवश्यक असून, संशयास्पद व्यवहारांची माहिती निवडणूक शाखेस सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

नाशिक : निवडणूक काळात बँकांनी बँकेत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील ठेवणे आवश्यक असून, संशयास्पद व्यवहारांची माहिती निवडणूक शाखेस सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवडणूक खर्चाबाबतच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. मांढरे पुढे म्हणाले, निवडणूक आचारसंहिता कालावधीत बँक खात्यातून आरटीजीद्वारे एका बँक खात्यातून अनेक व्यक्तींच्या खात्यात जमा होण्यावरही बँकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खातेदाराच्या किंवा त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या खात्यात जमा करणे किंवा काढणे यासाठी संबंधित खातेदाराने प्रतिज्ञापत्र बँकेकडे सादर करणे गरजेचे आहे. निवडणूक काळात अवैध रोकड नियंत्रणासाठी भारत निवडणूक आयोग आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार एटीएम मशीन्समध्ये रोकड जमा करताना वाहतुकीसाठी विहित कार्यप्रणालीनुसार वापर करावा. तसेच निवडणूक काळात खासगी विमान, हेलिकॉप्टर यांची सेवा पुरविताना नागरी उड्डाण मंत्रालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रवाशाच्या बॅगेची तपासणी करावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आयकर विभागाने या प्रकरणी तत्काळ प्रतिसाद यंत्रणा निर्माण केली आहे. बँकांनी त्यांच्या व्यवहाराच्या वापरासाठी उपयोगात आणावयाच्या रोखीच्या व्यवहारासाठी लागणाºया रोकड रकमेसाठी वाहतुकीसाठी उपयोगात येणाºया वाहनांबाबत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या मार्गदर्शनसूचनांची कटाक्षाने अंमलबजावणी करावी.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, आयकर विभागाचे सहसंचालक अमित सिंग, उपायुक्त आयकर मनोज सिन्हा, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक चरणसिंग राजपूत, अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक बी. व्ही. बर्वे आदी उपस्थित होते.आयकर विभागास कळविण्याच्या सूचनानिवडणूक कालावधीत राजकीय पक्षांकडून एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम खात्यात जमा करणे किंवा काढणे तसेच उमेदवारांच्या खात्यातून १० लाखांहून अधिक रोख रक्कम काढणे किंवा जमा करण्याची माहिती मिळाल्यास त्यासंदर्भात आयकर विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांना कळविण्यात यावे, अशा सूचनाही मांढरे यांनी दिल्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी